Home /News /maharashtra /

'यात आमचा काही संबंध नाही', सरनाईकांविरोधातील ED कारवाईचं भाजपकडून स्वागत

'यात आमचा काही संबंध नाही', सरनाईकांविरोधातील ED कारवाईचं भाजपकडून स्वागत

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. दरम्यान भाजपच्या प्रमुख नेत्यांनी या कारवाईचं स्वागत करत प्रताप सरनाईकांवर जोरदार टीका केली आहे

    मुंबई, 24 नोव्हेंबर: ठाण्याचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे (Enforcement Directorate ED) पथक घरी पोहोचले आहे. मनी लाँड्रिंगच्या संशयावरून प्रताप सरनाईक यांच्या घरी हे पथक पोहोचले  आहे. प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक ( vihang sarnaik) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ईडीच्या या कारवाईमुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली आहे. दरम्यान भाजप नेत्यांच्या देखील विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान याप्रकरणी भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी असं म्हटले आहे की,  'राजकीय सूडापोटी अशाप्रकारे कोणतही कारवाई करण्याचं कारण नाही आहे. ईडी स्वतंत्र स्वायत्त आहे, कायद्याने दिलेल्या चौकटीत ते कारवाई करतात.' या कारवाईशी भारतीय जनता पार्टीचा काय संबंध आहे असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे. ते पुढे म्हणाले की, 'जर ईडीकडे काही तक्रारी आल्या असतील, तर त्यांनी केलेली त्यांच्या स्तरावरील ती कार्यालयीन कारवाई आहे. त्याच्याशी भाजपाचा संबंध असण्याचे काही कारण नाही आहे. असं असतं तर सरसकट झालं असतं, स्वैराचार माजला असता. त्यामुळे मला वाटत नाही असं जाणीवपूर्वक काही केलं आहे. यथावकाश यातील सत्य बाहेर येईल.'  राजकीय सूडबुद्धीने अशाप्रकारची कारवाई झाली नसल्याची प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना दिली आहे. (हे वाचा-मोठी बातमी, प्रताप सरनाईक यांच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात) दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनी असे म्हटले आहे की, 'शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या परिवाराच्या अनेक कंपन्यांवर ईडीने धाड टाकली आहे. जर बोगस कंपन्या असतील, भ्रष्टाचाराचा पैसा असेल तर कारवाई व्हायलाच हवी. शिवसेना आणि त्यांचे मोठे नेते आहेत, जे मुख्य आहेत त्यांच्या परिवारांच्या उद्योगांबाबत सर्वांना माहित आहे. ईडीच्या कारवाईचं स्वागत'. किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईकांवर टीका करत सर्वच सेना नेत्यांवर निशाणा साधला आहे. (हे वाचा-सुरुवात तुम्ही केली शेवट आम्हाला करतो येतो, संजय राऊत भाजपवर भडकले) मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीला प्रताप सरनाईक यांच्यावर संशय आहे. त्यामुळे ठाण्यात 10 ठिकाणी ईडीच्या पथकाकडून पाहणी केली जात आहे. प्रताप सरनाईक यांच्या सुपुत्र पूर्वेश आणि विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक दाखल झाले आहे.  प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे इतर नेतेही ईडीच्या रडारवर असल्याची शक्यता आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Shivsena

    पुढील बातम्या