मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पैसे मोजत होते म्हणून मानेचा त्रास झाला, किरीट सोमय्यांचं वक्तव्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पैसे मोजत होते म्हणून मानेचा त्रास झाला, किरीट सोमय्यांचं वक्तव्य

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पैसे मोजत होते, त्यामुळे त्यांना मानवर करण्यासाठी वेळ मिळाला नाही'

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पैसे मोजत होते, त्यामुळे त्यांना मानवर करण्यासाठी वेळ मिळाला नाही'

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पैसे मोजत होते, त्यामुळे त्यांना मानवर करण्यासाठी वेळ मिळाला नाही'

राहुल खंदारे, प्रतिनिधी

मुंबई, 12 नोव्हेंबर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांना मानेचा त्रास झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. पण त्यांच्या प्रकृतीवरून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी टीका करण्याची संधी सोडली नाही. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पैसे मोजत होते आणि स्वकीयांना वाचवण्यात व्यस्त असल्यानेच त्यांना मानेचा त्रास झाला', असं वक्तव्य किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) केलं.

भाजपचे नेते किरीट सोमय्या आज बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या संस्थांना बुलडाणा अर्बन दिलेल्या कर्जाच्या प्रकरणी माहिती घेण्याकरिता आले होते.मात्र यावेळी आयकर विभागाला सर्व कागदपत्रे बुलडाणा अर्बनकडून दिल्या जात असल्याचं सांगून त्यांनी बुलडाणा अर्बनला क्लीन चिट दिली. मात्र या वेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेच्या दुखण्यावरूनही टीका केली.

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पैसे मोजत होते, त्यामुळे त्यांना मानवर करण्यासाठी वेळ मिळाला नाही. स्वत: च्या बायकोचे बेकायदेशीर बंगले बांधले होते, ते वाचवण्यासाठी ते व्यस्त होते. मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगले बांधले होते, ते वाचवण्यासाठी व्यस्त होते.  त्यामुळे त्यांना मानवर करण्यासाठी वेळ मिळाला नाही. अनिल परब यांनी कोरोनाच्या काळात दापोलीमध्ये रिसॉर्ट बांधला मार्च 2020 मध्ये वीजेचं कनेक्शन घेतलं आणि आता मार्च 2021 उद्घाटन केलं, त्यांना वाचवण्यासाठी ते व्यस्त होते, असं वक्तव्य किरीट सोमय्यांनी केलं.

पुरुषांमध्येही मेनोपॉज होतो का? महिला मेनोपॉजपेक्षा काय असतं वेगळं, वाचा सर्व

पण, थोड्याच वेळात किरीट सोमय्यांनी सारवासारव केली. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहे, त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी. यासाठी मी प्रार्थना करेन. ते आधी आमच्यासोबतच होते पण त्यांनी आता हिरवा रंग परिधान केला असला तरी ते भगवेधारीच आहे, असं सोमय्या म्हणाले.

'31 डिसेंबरच्या आधी ठाकरे सरकारच्या या अली बाबाच्या 40 चोरांचे घोटाळे बाहेर काढणार आहे. ते ही पुराव्यासह घोटाळे बाहेर काढणार आहे. महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करण्याचे लक्ष आहे. माझे 31 डिसेंबरपर्यंत 27 घोटाळे बाहेर काढण्याचे माझे लक्ष आहे, असं किरीट सोमय्यांनी सांगितलं.

‘क्रिप्टोकरन्सी इस्लाममध्ये हराम’; कोणी केली ही घोषणा?

'उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्याद्वारे आणि शरद पवार हे नवाब मलिक यांच्या माध्यमातून टीका करत आहे. पण, इंधनावर ठाकरे सरकार ३० रुपयांपेक्षा जास्त कर वसूल करत असते. मोदी सरकार हे ३० रुपयांपेक्षा कर कमी घेते, असा दावाही सोमय्यांनी केला.

'अब्रुनुकसानीचा फडतूस धमक्यांना मी घाबरत नाही. त्यांना काय खटले दाखल करायचे असेल तर त्यांनी करावे, पण या सरकारचे घोटाळे बाहेर काढणारच आहे, असंही सोमय्या म्हणाले.

First published:
top videos