Home /News /maharashtra /

''संजय राऊत, 24 तासात माझ्या पत्नीची माफी मागा, नाहीतर...''; सोमय्यांकडून अल्टिमेटम

''संजय राऊत, 24 तासात माझ्या पत्नीची माफी मागा, नाहीतर...''; सोमय्यांकडून अल्टिमेटम

भाजप नेते किरीट सोमय्यांनी (BJP leader Kirit Somaiya) पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांच्यावर आरोप करत त्यांना थेट मानहानीची नोटीस पाठवली आहे.

    मुंबई, 30 एप्रिल: भाजप नेते किरीट सोमय्यांनी (BJP leader Kirit Somaiya) पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांच्यावर आरोप करत त्यांना थेट मानहानीची नोटीस पाठवली आहे. टॉयलेट घोटाळ्यातील (toilet scam) आरोपांवर राऊतांना 48 तासांत माफी मागावी लागेल, असा अल्टिमेटम सोमय्यांनी दिला आहे. किरीट सोमय्यांनी संजय राऊत आणि महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर आरोप केले आहेत. यानंतर संजय राऊत सोमय्यांविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सोमय्या आणि त्यांचा कुटुंबियांचा टॉयलेट घोटाळा लवकरच बाहेर काढू, असा इशारा दिला. या घोटाळ्याचा पुरावा म्हणून संजय राऊतांनी एक व्हिडिओही ट्वीट केला होता. किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया आमची लढाई भ्रष्टाचार विरोधी आहे. या संदर्भात आम्ही गुन्हा दाखल केला आहे, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. शिवसेना संजय राऊत यांना मेधा सोमय्या यांनी defamation ची नोटीस दिली असल्याची माहिती सोमय्यांनी दिली.यावर त्यांनी 24 तासांत माफी मागावी, असं सोमय्यांनी म्हटलं आहे. 48 तासात माफी मागितली नाहीतर संजय राऊत यांच्या विरोधात सिविल आणि क्रिमिनल defamation मुलुंड पोलिसात तक्रार आणि कोर्टात याचिका दाखल करणार, असल्याचं सोमय्यांनी सांगितलं आहे. संजय राऊत यांचा मेधा सोमय्या यांचं चारित्र्य हनन करण्याचा डाव आहे. मेधा सोमय्या माझी पत्नी आहे. 35 वर्षे मुलांना शिकवतेय, असं किरीट सोमय्या म्हणालेत. बाळासाहेबांचं नाव घेत विरोधकांवर घणाघात, मुख्यमंत्र्यांचा Counter Attack संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते आहेत. संजय राऊत महा भित्रा आहे. संजय राऊत यांना धडा शिकवणार आहे, असं म्हणत सोमय्यांनी पुन्हा एकदा राऊतांवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणार असं म्हणत उद्धव ठाकरे यांचे 19 बंगले यांच्या विरोधात याचिका दाखल करणार आहे. त्यानंतर अनिल परब यांच्याविरोधात याचिका दाखल करणार, असं सोमय्यांनी म्हटलं आहे. त्यांच्याकडे एकही Document नसल्याचं ते म्हणालेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Kirit Somaiya, Sanjay Raut (Politician)

    पुढील बातम्या