मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आणि किरीट सोमय्यांनी केलं किशोरी पेडणेकरांचं कौतुक, 'त्या' व्हिडीओबद्दल म्हणाले...

आणि किरीट सोमय्यांनी केलं किशोरी पेडणेकरांचं कौतुक, 'त्या' व्हिडीओबद्दल म्हणाले...

किरीट सोमय्या यांनी केलं पेडणेकरांचं कौतुक!

किरीट सोमय्या यांनी केलं पेडणेकरांचं कौतुक!

उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटातील नेते कायमच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर असतात. मात्र त्यांनी यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचं कौतुक केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 डिसेंबर : उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटातील नेते कायमच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर असतात. मात्र दोन दिवसांपूर्वी वेगळं चित्र पहायला मिळालं. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि किरीट सोमय्या या दोघांनीही एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या देखील सोबत होते. यावेळी किरीट सोमय्या आणि किशोरी  पेडणेकर या दोघांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. तसेच नील सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांचा आशीर्वाद देखील घेतला. आता हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावर किरीट सोमय्या यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र इथेही त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना टोला लगावण्याची संधी सोडली नाही.

नेमकं काय म्हणाले सोमय्या? 

किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. किशोरीताईंनी माझ्या मुलाला आशीर्वाद दिला. किशोरीताई या माजी महापौर आहेत. त्यांनी माझ्या मुलाला आशीर्वाद देत आपली संस्कृती जपली. यालाच हिंदू संस्कृती म्हणतात, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. मात्र याचवेळी त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे.  उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या संस्कृतीचं प्रदर्शन सर्व महाराष्ट्रानं पाहिलं आहे. शिवीगाळ करणं असेल किंवा अपमान करण असेल हे सर्वांनी पाहिलं असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

संजय राऊतांवर निशाणा 

दरम्यान यावेळी किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. बाप बेटे जेल जाएंगे असं संजय राऊत म्हणत होते. मी अजूनही प्रतीक्षा करत आहे, मात्र तसं काही झालं नाही. परंतु संजय राऊत हे स्वत:च जेलमध्ये जाऊन आले. संजय पांडे हे देखील जेलमध्ये गेले आणि उद्धव ठाकरे घरी बसून असल्याचा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.

First published:
top videos

    Tags: Kirit Somaiya