मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मालक-नेत्यांकडे किती असणार मालमत्ता?', सोमय्यांचा पुन्हा एकदा शिवसेना नेत्यावर वार

'मालक-नेत्यांकडे किती असणार मालमत्ता?', सोमय्यांचा पुन्हा एकदा शिवसेना नेत्यावर वार

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी नुकतीच ठाकरे सरकारमधील नेत्यांची नावे जाहीर करत त्यांना 'डर्टी डझन' संबोधले होते.

    मुंबई, 20 मार्च: शुक्रवारी भाजप नेते किरीट सोमय्यांनी एक ट्विटनं खळबळ माजवली. त्यानंतर पुन्हा एकदा नव्या ट्विटनं त्यांनी शिवसेना नेत्यावर हल्लाबोल केला आहे. किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि नेत्यांवर आरोप करत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी नुकतीच ठाकरे सरकारमधील नेत्यांची नावे जाहीर करत त्यांना 'डर्टी डझन' संबोधले होते. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्ट (Anil Parab resort) संदर्भात किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. किरीट सोमय्या यांनी थेट हे रिसॉर्ट पाडण्याबाबत ट्विट केलं. त्यानंतर आता सोमय्या शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav)  यांच्यावर आरोप केला आहे. शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत यांनी 24 महिन्यात मुंबईत 1000 घर/दुकान/गाळे असलेल्या 36 बिल्डिंग ( जुन्या पघडीचा इमारती) विकत घेतल्या. एक हजार रुपये कोटींचा घोटाळा बाहेर आला आहे. ईडी, कंपनी मंत्रालय, आयकर विभागाद्वारे तपास चालू आहे, काही दिवसात कारवाईची अपेक्षा आहे,असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. जाधव परिवाराकडे एवढी मालमत्ता आहे तर त्यांचा "मालक - नेत्यां" कडे किती असणार!!!? , असा सवाल किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे. यशवंत जाधव यांच्या घरी Income Tax चा छापा गेल्या महिन्यात शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी आयकर विभागानं छाडी टाकल्या. सलग 4 दिवस आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या संपत्तीवर धाड सुरुच ठेवली होती. आयकरचे अधिकारी मोठ्या मोठ्या पिशव्या आणि बॉक्स भरुन कागदपत्रे घेवून जाधव यांच्या घरातून आणि इतर कार्यालयांतून बाहेर पडले (Income tax department seized documents)होते. सीआरपीएफ जवानांसह (CRPF Jawan) आयकर विभागाचं पथकानं सकाळीच त्यांच्या घरी पोहोचले होते. यशवंत जाधव यांच्याशी संबंधीत एक दोन ठिकाणी नाही तर तब्बल 30 पेक्षा जास्त ठिकाणी आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. ज्यात जवळपास 1 कोटी रुपये रोख आयकर विभागाला आढळल्याचे बोलले जात आहे. शिवाय बेनामी संपत्तीचे कागदपत्रे, काही महत्वपुर्ण कागदपत्रे, कॉम्प्युटर हार्ड डिस्क, लॅपटॉप, मोबाइल फोन, प्रिंटर, स्कॅनर, सरकारी दस्तावेज आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पैशांची आणि व्यवहारांची नोंदी केलेली डायरी आयकर विभागाला धाडीत सापडली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BJP, Kirit Somaiya, Shivsena

    पुढील बातम्या