गृहमंत्र्यांनी बाकीची स्टंटबाजी बंद करावी अन्..., भाजप नेत्यानं केली जहरी टीका

गृहमंत्र्यांनी बाकीची स्टंटबाजी बंद करावी अन्..., भाजप नेत्यानं केली जहरी टीका

कोविड केअर सेंटरमध्ये एका सुरक्षारक्षकानं विवाहित महिलेचा विनयभंग

  • Share this:

मुंबई, 6 सप्टेंबर: गृहमंत्र्यांनी (Home minister) बाकीची स्टंटबाजी बंद करावी आणि कोविड सेंटरमधील (Covid center) महिलांच्या सुरक्षेकडे (Womens Security)लक्ष द्यावे, अशी घणाघाती टीका भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमाय्या (bjp leader kirit somaiya)यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (maharashtra Home minister Anil deshmukh) यांच्यावर केली आहे.

मुंबईत कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत, सीसीटीव्ही बसवण्याबाबत बीएमसीनं कोणतीही काळजी घेतली नसून घटना घडून 24 तास उलटले तरी बीएससीच्या अधिकाऱ्यांना घटनेबाबत काहीच कल्पना नव्हती, अशी माहिती किरीट सोमाय्या यांनी दिली आहे.

हेही वाचा... नाट्यमय घडामोडी! राष्ट्रवादीची ऐनवेळी माघार, भाजपच्या गळ्यात उपमहापौरपदाची माळ

मुंबईतल्या कुरार परिसरात असणाऱ्या पठाणवाडी जंक्शनजवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये एका सुरक्षारक्षकानं विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनास्थळी किरीट सोमाय्या यांनी भेट दिली. या दरम्यान किरीट सोमाय्या यांनी थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय आहे प्रकरण?

पठाणवाडीजंक्शन जवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाने कोविड सेंटरमध्ये घुसून महिलेचा हात पकडून तिचे तोंड दाबून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरक्षारक्षकाला अटक करुन कोर्टात हजर केलं. कोर्टानं आरोपी सुरक्षारक्षकाला 1 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर भाजपचे नेते किरीट सोमाय्या यांनी घटनास्थळी दाखल होवून हॉस्पिटल प्रशासन आणि पोलिसांशी चर्चा केली.

हेही वाचा...भाजप अध्यात्मिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष तुषार भोसलेंसह 9 जणांवर गुन्हा

राज्य सरकारवर गंभीर आरोप...

कोविड सेंटरमध्ये 2 बलात्कार आणि 12 विनयभंगाच्या घटना घडूनही बार, रेस्टॉरंट, जीम आणि स्विमिंग पूल साठी SOP जाहीर करणाऱ्या सरकारनं कोविड सेंटरमधील महिलांच्या सुरक्षेकरता हॉस्पिटलला कोणताच SOP जाहीर केली नाही, असा आरोप भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 6, 2020, 2:13 PM IST

ताज्या बातम्या