रत्नागिरी, 22 नोव्हेंबर : भाजप नेते किरीट सोमय्या दापोली दौऱ्यावर येत आहेत. तसेच ते आज दापोली पोलीस स्टेशनला भेट देऊन ते साई रिसॉर्ट पाडकामाची माहिती घेणार आहेत. त्यामुळे दापोलीतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा आज दापोलीत निघाले आहेत. "चला" ठाकरे सरकारचा घोटाळ्यांचे स्मारक, असे म्हणत "ट्वीन रिसॉर्ट तोडूया" असे ते म्हणाले आहेत. तसेच आज पहाटे साडेतीन वाजता के दापोली पोहोचले आहेत. आणि 10 वाजता दापोली पोलीस स्टेशन यानंतर 11 वाजता सी कोंच रिसॉर्ट / साई रिसॉर्ट येथे ते जाणार आहे.
मुरुड समुद्र किनाऱ्यावरील साई रिसॉर्ट व सीकोंच दोन्ही रिसॉर्ट गेले अनेक दिवस वादग्रस्त ठरले आहेत. यापैकी सिकोंच रिसॉर्टवर हातोडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच प्रशासनाकडून पाडकामाची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.
हेही वाचा - ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदाराचा मोठा दावा
माजी मंत्री अनिल परब यांचे साई रिसॉर्ट सध्या तरी पडण्याची शक्यता नसून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने तूर्तास रिसॉर्ट मालकाला दिलासा मिळणार आहे. परंतु पुष्कर मुळे यांच्या मालकीचे असलेले सिकोंच रिसॉर्ट कोणत्याही क्षणी पाडले जाऊ शकते. किरीट सोमय्या दापोली पोलीस स्थानकाला भेट दिल्यानंतर मुरुड येथे प्रशासनाकडून कोणती तयारी केली याचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत.
अनिल परब यांना अटकपूर्व जामीन मंजूर -
साई रिसॉर्ट प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. साई रिसॉर्ट हा बेकायदेशीर आहे. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच काही दिवसांपूर्वी हे रिसॉर्ट पाडण्यासंबंधी एक जाहिरात देखील वृत्तपत्रात छापून आली होती. यानंतर साई रिसॉर्ट प्रकरणात माजी मंत्री अनिल परब यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.