मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

''राऊत आई- बहिणीवरुन शिव्या देताहेत, माझ्या कुटुंबाला नाहक त्रास होतोय'': किरीट सोमय्या

''राऊत आई- बहिणीवरुन शिव्या देताहेत, माझ्या कुटुंबाला नाहक त्रास होतोय'': किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्यांनी (BJP leader Kirit Somaiya)  नुकतीच पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत (press conference)  त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

मुंबई, 21 फेब्रुवारी: भाजप नेते किरीट सोमय्यांनी (BJP leader Kirit Somaiya) नुकतीच पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत (press conference) त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी आक्षेपार्ह भाषेचा केलेल्या वापराबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांमार्फत संजय राऊत शिव्या देत असल्याची प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी दिली आहे. आता यात जोडे मारण्याची भाषा करतात. या शब्दाचं अर्थ कळतो का संजय राऊत यांना? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच माझ्या बायको, माझ्या आईला विचारा की या शब्दांचा अर्थ काय होतो, असंही सोमय्या म्हणालेत. संजय राऊत जशा आई बहिणीवरच्या शिव्या देत आहे त्यामुळे माझे कुटुंब व्यथित आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. BMC अधिकारी बंगल्यावर आल्यानंतर काय करणार नारायण राणे? माझ्या विरोधात काही सापडत नाही आहे म्हणून हे जुन्या केसमध्ये मला अडकावत असल्याचा आरोपही किरीट सोमय्यांनी केला आहे. संजय राऊत यांना कोविड, वाइन असे सगळे घोटाळे लपवायचे आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. संजय राऊत चाणक्य आहे. त्यांनी वाधवा यांचा उल्लेख केला. दुनियेला माहिती आहे. पवार आणि वाधवा यांचं संबंध जगाला माहिती आहे. मला सुप्रिया ताईंवर आरोप करायचे नाही, असं किरीट सोमय्यांनी स्पष्ट केलं आहे. पुढे किरीट सोमय्या म्हणाले की, ईडी अधिकाऱ्याने बंदूक दाखवली तक्रार करा, पुरावे द्या. PMC बँक शी माझा दूरपर्यंत संबंध नाही आहे. तसंच माझे वडील आणि माझ्या वडिलांचे मित्र यांनी 1986 मध्ये एक प्रोजेक्ट सुरू केला. माझ्या वडिलांनी माझ्या आईला, माझ्या आईने माझ्या बायकोला आणि माझ्या बायकोनं माझ्या मुलाला काही शेयर दिले. 211 घोटाळे आहेत माझे तर राज्य सरकारने तक्रार का केली नाही?, असा सवालही सोमय्यांनी उपस्थित केला आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Kirit Somaiya, Sanjay raut

पुढील बातम्या