मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /''वसुलीचा पैसा अनिल परब यांच्यासह NCPच्या नेत्यांकडे जायचा'', किरीट सोमय्यांचं नवं Tweet

''वसुलीचा पैसा अनिल परब यांच्यासह NCPच्या नेत्यांकडे जायचा'', किरीट सोमय्यांचं नवं Tweet

 अमरावती पोलीस आयुक्त यांनी अमरावती जिल्ह्यात शहरात सध्या संचारबंदी लागू असल्याने दौरा स्थगित करावा, असे पत्र पाठवले आहे.

अमरावती पोलीस आयुक्त यांनी अमरावती जिल्ह्यात शहरात सध्या संचारबंदी लागू असल्याने दौरा स्थगित करावा, असे पत्र पाठवले आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. आता इतर नेत्यांचा नंबर आला आहे.

मुंबई, 05 नोव्हेंबर: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (money laundering case) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) हे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कोठडीत आहेत. आता याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना (Shivsena) , राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP)निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या म्हणाले, अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. आता इतर नेत्यांचा नंबर आला आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विट केलं, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. आता इतर नेत्यांचा नंबर आला आहे. वसुलीचा पैसा मुलगा, जावई, भागीदार... आणि अनिल परब यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांपर्यंत पोहोचत होता.

अनिल देशमुखांच्या मुलाला ईडीने बजावला समन्स

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख (Rishikesh Deshmukh) यांना ईडीने समन्स बजावला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख सध्या ईडीच्या कोठडीत आहे. काल अनिल देशमुख यांची चौकशी झाली होती. त्यानंतर आता ईडीने ऋषिकेश देशमुख यांनाही समन्स बजावला आहे. आज त्यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावले आहे. अनिल देशमुख आणि ऋषिकेश यांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- ...म्हणून अजित पवारांनी केली Corona Test, रिपोर्ट येणं बाकी; शरद पवारांची माहिती

याआधीही ईडीनं ऋषिकेश देशमुख यांना समन्स बजावला होता. ईडीच्या वकिलांनी न्यायालयात जे मुद्दे मांडले त्यानुसार अनिल देशमुख यांना 4 कोटी 70 लाख रुपये बार सुरू ठेवण्यासाठी मिळाले आणि त्यांनी हा पैसा ऋषिकेश देशमुख यांना दिला. जेणेकरुन दिल्लीतील पेपर कंपनीच्या माध्यमातून हा पैसा पुन्हा श्री साई शिक्षण संस्थेकडे दानच्या माध्यमातून आला. या गुन्ह्यात परदेशी व्यक्तींचा सहभाग नाकारता येत नाही. एका गुप्त व्यक्तीच्या जबाबात असं सांगण्यात आलंय की, ऋषिकेश देशमुख एका अशा व्यक्तीच्या शोधात होता जो रोख रक्कम घेवून ट्रस्ट मध्ये दान करेल. नागपुरहून कॅश हवालाच्या माध्यमातून दिल्लीला पाठवली जायची आणि ऋषिकेश देशमुख याची सर्व व्यवस्था पहायचा, असाही संशय ईडीने व्यक्त केला आहे.

Anil Deshmukh विरोधात केला धक्कादायक दावा

ईडीनं न्यायालयाला सांगितलं की, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे या गुन्ह्यातील कमाईचे "मुख्य लाभार्थी" होते. तसंच देशमुख मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात थेट सहभागी होते, त्यासाठी त्यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला आहे. अनिल देशमुख या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा म्हणून पुढे आलं असल्याचं ED नं आपल्या रिमांड नोटमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणात परकीय षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचंही ईडीने म्हटलं आहे.

हेही वाचा- इंधन दर कपातीवरुन शिवसेनेनं BJP वर साधला निशाणा

डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत राज्याचे गृहमंत्री असताना देशमुख यांनी आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ईडीने केला आहे. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक (नंतर दुसर्‍या गुन्हेगारी प्रकरणात सेवेतून बडतर्फ) सचिन वाझे यांच्यामार्फत वेगवेगळ्या वेळी मुंबई आणि रेस्टॉरंटमधून 4.70 कोटींहून अधिक रक्कम वसूल केली. 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीनं सोमवारी रात्री उशिरा देशमुख यांना अटक केली. ईडीने देशमुख यांना सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पीबी जाधव यांच्यासमोर हजर केले. तेथून त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली.

First published:
top videos

    Tags: BJP, Kirit Somaiya, Shivsena