मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

किरीट सोमैयांचा शिवसेनेवर पलटवार! महापौर, ठाकरे सरकारविरोधात हायकोर्टात जनहित याचिका

किरीट सोमैयांचा शिवसेनेवर पलटवार! महापौर, ठाकरे सरकारविरोधात हायकोर्टात जनहित याचिका

संजय राऊत आणि शिवसेना नेते गप्प का?

संजय राऊत आणि शिवसेना नेते गप्प का?

संजय राऊत आणि शिवसेना नेते गप्प का?

मुंबई, 13 नोव्हेंबर: भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या (Bjp Leader kirit somaiya) यांनी शिवसेनेवर थेट गंभीर आरोप केले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayer Kishori Pedanekar) यांच्यासह ठाकरे सरकार, (CM Udhav thackeray Government) महापालिका (Mumbai Municipal Corporation) विरोधात मुंबई हायकोर्टात (Mumbai High court) जनहित याचिका दाखल केल्याची माहिती किरीट सोमैया यांनी दिली आहे.

कोरोनाच्या काळात 12 हजार कोटी रुपये खर्च करून मुंबईत 5000 खाटांचं कोविड हॉस्पिटल बांधण्यात आलं. त्यात 3000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. या प्रकरणी तपास लोकायुक्तांनी करावा, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एवढ्या मोठ्या  घोटाळ्याबाबत महापौरांना जाब का विचारला नाही, त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल किरीट सोमैया यांनी केला आहे.

हेही वाचा..संजय राऊत किरीट सोमय्यांवर भडकले, दिली जाहीर 'वॉर्निंग'

मुंबईत पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमैया यांनी राज्य सरकारवर सणसणीत आरोप केले आहेत. किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार, मुंबई महापालिका आणि एसआरएच्या विरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी यावेळी दिली. दिवाळीनंतर याच्यावर सुनावणी होईल, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीआधी आणखी तीन घोटाळे बाहेर काढणार असल्याचा गौप्यस्फोट देखील यावेळी किरीट सोमैया यांनी केला आहे.

मुंबईत गरीब झोपडपट्टी वासीयांसाठी बांधण्यात आलेले अर्धा डझणाहून अधिक गाळे अपारदर्शकरित्या महापौर यांनी स्वत:च्या परिवाराच्या ताब्यात ठेवले आहेत, असा घणाघाती आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे. याबाबत सर्व पुरावे याचिकेत दिले आहेत, असंही त्यांनी जाहीरपणे सांगितलं.

मुंबईच्या महापौरांनी हेराफेरी केली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी यावेळी केली. सातत्याने ठाकरे सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतरही एसआरए, मुंबई पोलिसांनी महापौरांवर कारवाई केली नाही. एवढंच नाही तर महापौरांनी बनावट सही करत करार केला. कागदपत्रं पोलीस ठाण्यात सादर करुन तक्रार केल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही.

किरीट सोमैया यांनी यावेळी दहिसर जमीन घोटाळ्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, जी जमीन 2 कोटी 55 लाख रुपयांना अल्पेश अजमेरा यांनी घेतली. त्यासाठी निशल्प रिॲल्टी बिल्डरनं 900 कोटींची मागणी केली आहे.

हेही वाचा..सरकारकडून पेन्शनर्ससाठी दिवाळी गिफ्ट; केवळ ७० रुपयांत घ्या या सेवेचा लाभ

संजय राऊत आणि शिवसेना नेते गप्प का?

मुंबईत कोरोनाच्या काळात 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. महापौर हा शिवसेनेचा आहे. मग आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते का बोलत नाहीत, असा सवाल किरीट सोमैया यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मी आर्थिक व्यवहार केलेत त्याची उत्तरं द्यावीत, असं थेट आव्हान सोमैया यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.

याबाबत कोणतेही कागदपत्रं सरकारकडे नाहीत, असं स्वत: मुख्यमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना सांगितल्याचा दावा देखील सोमैया यांनी यावेळी केला

First published:

Tags: BJP, Maharashtra, Mumbai, Udhav thackarey