बड्डे आहे भाजप नेत्याचा, मग कार्यक्रम पार पाडला उद्घाटनाचा!

बड्डे आहे भाजप नेत्याचा, मग कार्यक्रम पार पाडला उद्घाटनाचा!

8 जूनपासून राज्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र सण, उत्सव, सार्वजनिक कार्यक्रमांना अजूनही परवानगी नाही.

  • Share this:

बदलापूर, 09 जून : कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. लोकांची गर्दी जमू नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकारकडून सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमास मनाई करण्यात आली आहे. परंतु, असं असलं तरी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात भाजप गटनेत्याने उद्घाटन आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम उरकून टाकला.

बदलापूरमधील  भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी हेंद्रेपाडा भागात उद्यानाच्या उद्घाटनाचा आणि मैदानाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. विशेष म्हणजे, मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी फित कापून उद्यानाचे उद्घाटन केले. तर इतर भाजप पदाधिकाऱ्यांनी नारळ फोडून मैदानाचे भूमिपूजन केले.

हेही वाचा-पिंपरी चिंचवड हादरलं, प्रेम करण्याच्या संशयावरून तरुणाची निर्घृण हत्या

घोरपडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. 8 जूनपासून राज्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र सण, उत्सव, सार्वजनिक कार्यक्रमांना अजूनही परवानगी नाही.

'आम्ही उद्यानाचे उद्घाटन केले नाही, फक्त मैदानाचे भूमिपूजन केले. मात्र, त्यासाठी कोणताही सोहळा आयोजित केला नाही. प्रभागातील नागरिकांच्या मागणी वरून उद्यान त्याच्यासाठी खुले केले, असं राजन घोरपडे यांनी सांगितलं.

हेही वाचा-500 लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या धक्कादायक घटनेप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

मात्र, असे असतांना सुद्धा बदलापुरात हा उद्घाटनाचा कार्यक्रम आज पार पडला. या ठिकाणी  फिजिकल डिस्टन्सिंग पाळून कार्यक्रम करण्यात आला असला तरी मात्र हा कार्यक्रम करण्याची गरज होती का? असा सवाल उपस्थित होत आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 9, 2020, 9:31 AM IST

ताज्या बातम्या