मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लग्नसोहळ्यात भाजपच्या नेत्आने हवेत केला गोळीबार, अंबरनाथमधला VIDEO व्हायरल

लग्नसोहळ्यात भाजपच्या नेत्आने हवेत केला गोळीबार, अंबरनाथमधला VIDEO व्हायरल

धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावेळेस शिवाजी पाटील हवेत गोळीबार करत होते त्याच वेळेस त्याच्या शेजारी असलेल्या एका तरुणाच्या हातात देखील रिव्हॉल्वर असल्याचं दिसत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावेळेस शिवाजी पाटील हवेत गोळीबार करत होते त्याच वेळेस त्याच्या शेजारी असलेल्या एका तरुणाच्या हातात देखील रिव्हॉल्वर असल्याचं दिसत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावेळेस शिवाजी पाटील हवेत गोळीबार करत होते त्याच वेळेस त्याच्या शेजारी असलेल्या एका तरुणाच्या हातात देखील रिव्हॉल्वर असल्याचं दिसत आहे.

अंबरनाथ, 1 डिसेंबर : लग्नात फटाक्यांची आतिषबाजी हा नवीन विषय नाही. पण एका लग्न सोहळ्यात भर गर्दीत भाजपच्या (bjp) तालुकाध्यक्षाने हवेत गोळीबार (gun fire) केल्याची घटना अंबरनाथ (ambarnath) तालुक्यात घडल्याचे समोर आले आहे. गोळीबार करतानाच हा सगळा  व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

अंबरनाथ तालुक्यातील आणि उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलंगगड परिसरात ही घटना घडली. मलंगगड परिसरातील हाजीमलंगवाडी गावात 29 नोव्हेंबर रोजी एक लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. या लग्नात शिवाजी पाटील नावाच्या इसमाने मोठ्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला. तर याच व्हिडीओमध्ये एक तरुण हातात रिव्हॉल्वर घेऊन उभा असल्याचं दिसून येत आहे.  त्याच्या बाजूला याच गावातील उपसरपंच देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिललाईन पोलिसांकडून व्हिडीओची चौकशी सुरू करण्यात आली.

ज्या बंदूकीतून हा गोळीबार करण्यात आला ती बंदूक नेमकी कोणत्या प्रकारची होती? यासह सर्वच गोष्टींचा तपास पोलिसांनी सुरू केलाय. या घटनेत दोषी असणार्‍यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिलीय. मात्र, अद्याप या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसल्यानं कॅमेरासमोर बोलण्यास त्यांनी तूर्तास नकार दिला.

नियमित तूप खाण्याचे आहेत अनेक फायदे; हृतिक रोशनलादेखील आवडतं तूप

दरम्यान, लग्न सोहळ्यामध्ये हवेत गोळीबार करणारा शिवाजी पाटील हा भाजपचा अंबरनाथ तालुका उपाध्यक्ष असल्याची माहिती देखील समोर येत आहे. यासंबंधी सोशल मीडियावर काही बॅनर्स व्हायरल होत असून त्यामध्ये पाटील याच्या भाजप पक्षातील पदाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. शिवाय हा जो लग्न सोहळा होता तो मलंगगड परिसरातील श्याम पाटील यांच्या मुलाचा होता, अशी माहिती देखील आता समोर येत आहे.

'आम्हाला KL Rahulला रिटेन करायचे होते, पण..पंजाब संघाच्या सहमालकाचा मोठा खुलासा

धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावेळेस शिवाजी पाटील हवेत गोळीबार करत होते त्याच वेळेस त्याच्या शेजारी असलेल्या एका तरुणाच्या हातात देखील रिव्हॉलवर असल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे उल्हासनगर हिल लाईन पोलीस आता गुन्हा दाखल करून यासंदर्भात काय कारवाई करत आहेत का हे पाहावे लागेल.

First published:
top videos