• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • भाजप कार्यालयात राडा, कार्यकर्त्याकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ

भाजप कार्यालयात राडा, कार्यकर्त्याकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ

बैठक आटोपल्यानंतर आमदार गिरीश महाजन आणि पदाधिकारी हे बाहेर आले होते. त्यावेळी एका कार्यकर्ता दारासमोर लोळत होता.

 • Share this:
  जळगाव, 31 ऑक्टोबर : जळगावमध्ये भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना एका कार्यकर्त्याने शिवीगाळ केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तसंच या कार्यकर्त्याने एका भाजप पदाधिकाऱ्याच्या कारवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे. दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. बैठक आटोपल्यानंतर आमदार गिरीश महाजन आणि पदाधिकारी  बाहेर आले होते. त्यावेळी एका कार्यकर्ता दरवाजातच लोळत होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी तो मनोरुग्ण असल्याचे सांगत त्याला बाजूला नेले होते. भारतीय दिग्दर्शिकेचा श्रीलंकेतला सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत; पण कॅनडाची एंट्री त्यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमाच्या प्रतिनिधीशी संवाद साधला आणि कार्यालयातून निघून गेले. काही वेळाने गिरीश महाजन हे पुन्हा एकदा भाजप कार्यालयात आले होते. त्यावेळी विजय नावाच्या या कार्यकर्त्याने महाजनांना शिवीगाळ केली.  हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने एका कारवर दगडफेक सुद्धा केली. या संपूर्ण घटनेबद्दल एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मात्र, ही व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता नसून मनोरुग्ण असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकारानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी भाजपच्या कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. नेत्याच्या घरात IT ची छापेमारी; 50 लाखांची कॅश, सव्वा कोटींचे दागिने केले जप्त दरम्यान, 'सदरील तरुण हा मद्यपी होता, तो अचानक कार्यालयात आला होता. त्यानंतर त्याने गोंधळ घातला. तो आमच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही' असं महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला गिरीश महाजन, विजय पुराणीक, खासदार रक्षा खडसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी हजर होते.
  Published by:sachin Salve
  First published: