Home /News /maharashtra /

...समर्थक सुद्धा त्यांची राहिली नाही, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना टोला

...समर्थक सुद्धा त्यांची राहिली नाही, गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना टोला

'कुणी कुठे जावं ज्याचा त्याचा प्रश्‍न असून मात्र कुणी कितीही सांगितलं की, भाजपला धक्का तर भाजपला कुठेही धक्काबुक्की नाही'

'कुणी कुठे जावं ज्याचा त्याचा प्रश्‍न असून मात्र कुणी कितीही सांगितलं की, भाजपला धक्का तर भाजपला कुठेही धक्काबुक्की नाही'

'कुणी कुठे जावं ज्याचा त्याचा प्रश्‍न असून मात्र कुणी कितीही सांगितलं की, भाजपला धक्का तर भाजपला कुठेही धक्काबुक्की नाही'

  जळगाव, 25 सप्टेंबर : जळगावमधील (jalgaon) भाजपचे 11 नगरसेवकांनी ( 11 corporators join Shiv Sena) शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकाच वेळी 11 नगरसेवक सेनेनं गेल्यामुळे भाजपला (bjp) धक्का मानला जात आहे. पण, 'आम्हाला कुठलाही धक्का जिल्ह्यामध्ये नाही बोदवड मुक्ताईनगर (mukatainagar) येथील शिवसेनेत गेलेले सगळे नगरसेवक खडसे समर्थक होते. खरंतर हे राष्ट्रवादीमध्ये (ncp) जाणं अपेक्षित होतं' असं म्हणत भाजपचे नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे  (eknath khadse)यांच्यावर निशाणा साधला. जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत असताना गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. 'जळगाव जिल्ह्यातील 11 भाजपा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजपला धक्का दिल्याचे म्हटलं होतं. मात्र आम्हाला कुठलाही धक्का जिल्ह्यामध्ये नाही बोदवड मुक्ताईनगर येथील शिवसेनेत गेलेले सगळे नगरसेवक खडसे  समर्थक होते. खरंतर हे राष्ट्रवादीमध्ये जाणं अपेक्षित होतं. आतापर्यंत मुक्ताईनगर मतदारसंघात खडसे समर्थक जे होते. मात्र आता त्यांचे समर्थक देखील त्यांचे राहिले नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आमचे अस्तित्व त्या ठिकाणी दाखवू' अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. वडिलांच्या जागी काम करणाऱ्या मिन्नूने घडवला इतिहास, UPSC परीक्षेत मिळवलं मोठं यश तसंच, 'जळगाव जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा अभेद्य बालेकिल्ला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला परिणाम समोर येतील. कुणी कुठे जावं  ज्याचा त्याचा प्रश्‍न असून मात्र कुणी कितीही सांगितलं की, भाजपला धक्का तर भाजपला कुठेही धक्काबुक्की नाही. महाविकास आघाडी सरकारचा नेत्यांनी आपले तिन्ही पक्ष सांभाळावे, कारण येणाऱ्या निवडणुकीत सर्व निकाल समोर येतील,  असा इशाराही महाजन यांनी दिला. 'धार्मिक स्थळ उघडी करण्यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली. एकीकडे कोरोनाचे कारण दाखवले जात होते, मात्र महाविकास आघाडीचे नेते हजारो लोकांचे कार्यक्रम घेतात त्याला मात्र कुठेही बंदी नसून भाविकांना मात्र मंदिरं बंद हे शासनाची दुटप्पी भूमिका होती, अशी टीकाही महाजन यांनी राज्य सरकारवर केली. पुढील 3 तासात बंगालच्या उपसागरात निर्माण होणार चक्रीवादळ; 4 दिवस राज्यात कोसळधार 'आरोग्य विभागाने गाजावाजा करत भरती करत असल्याचे सांगत साडेसहा हजार जागा काढल्या व यासाठी तीन लाखांवर लोकांनी अर्ज केले परीक्षेची तारीख जाहीर केली हॉल तिकीट दिली व वेळेवर परीक्षा रद्द केली. शासनाच्या भोंगळ कारभाराचं    हे उत्तम उदाहरण असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द करून माफी मागितली हे म्हणजे थट्टा करण्यासारखे आहे, अशी टीकाही महाजन यांनी केली.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Eknath khadse, Girish mahajan, एकनाथ खडसे

  पुढील बातम्या