नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी सुरू असताना निघाली घोरपड, या नेत्याने दिले जिवदान

नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी सुरू असताना निघाली घोरपड, या नेत्याने दिले जिवदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी सुरू असताना घोरपड निघाल्याने एकच गोंधळ उडला.

  • Share this:

राजेश भागवत,(प्रतिनिधी)

जळगाव,11 ऑक्टोबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी सुरू असताना घोरपड निघाल्याने एकच गोंधळ उडला. यावेळी भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे वन्यजीव प्रेम पाहायला मिळाले. गिरीश महाजन यांनी घोरपडीला जिवदान दिले.

जळगाव विमानतळासमोर भारत फोर्ड कंपनीच्या शंभर एकर जागेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी, 13 ऑक्टोबर रोजी जाहीर सभा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची जळगावात पहिलीच सभा होत आहे. पालकमंत्री गिरीश महाजन हे पंतप्रधान मोदी यांच्या जाहीर सभेच्या ठिकाण व्यवस्थेची पाहाणी करत असताना सभा मंडप उभारणार्‍या कर्मचार्‍यांना घोरपड दिसली. त्या घोरपडीला मारणार इतक्यात गिरीश महाजनांनी जोरात दिला. तिला मारू नका…असे म्हणत धावतच घोरपडीजवळ पोहोचले. दरम्यान, घोरपड लिंबाच्या झाडावर चढली होती. झाडावरून घोरपड खाली उतरताच गिरीश महाजनांनी तिच्या तोंडावर पाय ठेवून तिचे तोंड अलगद पकडले. सिमेंन्टच्या रिकाम्या गोणीत तिला बंद केले. त्यानंतर घोरपड असलेली पिशवी स्वत:च्या गाडीत ठेवायला सांगितले व मी तिला लांब सोडून देईन, असे सांगितले. घोरपडीला उपस्थित शेकडो कर्मचारी घाबरत होते. परंतु गिरीश महाजन यांनी तिला पकडले. तेव्हा सर्वच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले. दरम्यान, जळगाव विमानतळासमोर भारत फोर्ड कंपनीच्या जागेत नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. याप्रसंगी नाशिक विभागाचे डिआयजी छेरिंग दोरजे, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.उगले, आ.चंदूभाई पटेल, नंदू आडवाणी तसेच मोठ्या संख्येने काम करणारे कर्मचारी उपस्थित होते. या सभेच्या ठिकाणी निघालेल्या घोरपडीला गिरीश महाजन यांनी अलगदपणे जिवंत पकडल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.

अभिजीत बिचकुलेनं उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 09:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading