उद्धव ठाकरेंचं सरकार म्हणजे, ‘अंधेर नगरी, चौपट राजा’

उद्धव ठाकरेंचं सरकार म्हणजे, ‘अंधेर नगरी, चौपट राजा’

सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला आहे त्यात उत्तर महाराष्ट्राचं साधं नाव सुद्धा नाही. हे सरकार फक्त पश्चिम महाराष्ट्रपुरतेच मर्यादित आहे की काय?

  • Share this:

भुसावळ 08 मार्च :  महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कुणाचा कुणाला ताळमेळ नाही. हे सरकार म्हणजे गोंधळ आहे. ‘अंधेरी नगरी, चौपट राजा’अशी या सरकारची परिस्थिती असून शेतकऱ्यांचे कैवारी होऊ पाहणाऱ्या या सरकारमध्ये मात्र कुणाचं कुणाला काहीही माहिती नाही अशा परिस्थितीत आहे अशी टीका माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे कृतज्ञता सत्कार सोहळा समारंभी बोलताना केली. युती सरकारच्या काळात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 65 कोटी चा भरगोस निधी वरणगावच्या विकासाकरता उपलब्ध करून दिला होता त्या अनुषंगाने धरणगावातील विविध विकास कामांचे लोकार्पण करून  गिरीश महाजन यांचा भव्य कृतज्ञता सत्कार करण्यात आला.

महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत गिरीश महाजन म्हणाले, सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला आहे त्यात उत्तर महाराष्ट्राचं साधं नाव सुद्धा नाही. कुठला निधी नाही. अपूर्ण योजना पूर्ण कशा करायच्या हा प्रश्न सध्या आमच्यासमोर आहे. हे सरकार फक्त पश्चिम महाराष्ट्रपुरतेच मर्यादित आहे की काय?  तर उर्वरित महाराष्ट्राचं होणार काय? असा सवाल केला. अर्थसंकल्प करत असताना तो सर्वसमावेशक असला पाहिजे मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही.

VIDEO : नळातून पाणी नाही तर चक्क आली रेड वाइन, लोकांची उडाली झुंबड

आमच्या काळात आम्ही सर्वांना न्याय दिला होता. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व रखडलेली कामे आम्ही पूर्ण केली. पण सरकार बदललं त्यामुळे सर्व चित्र बदलले. शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करून अशा घोषणा झाल्या. पण कुठे काय? शेतकऱ्यांना अनेक महिन्यांपासून ट्रांसफार्मर मिळत नाही मग तो शेतकरी जगेल की मरेल?

सलमाननं शेअर केले आयतसोबतचे खास क्षण, पाहा मामा-भाचीचा हा क्यूट VIDEO

विहिरीमध्ये, धरणांमध्ये, नद्यांमध्ये पाणी आहे पण वीजच नाही. मग शेतकऱ्यांनी करायचं तरी काय ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. लोकहिताच्या कामाला विद्यमान सरकारने कुठेही स्थगिती देवू नये राजकारणा ठिकाणी राजकारण करू पण लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवतो अशा ठिकाणी अशा गोष्टी होता कामा नये. असेही गिरीश महाजन या प्रसंगी म्हणाले.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2020 10:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading