इम्तियाज अली, प्रतिनिधी
जळगाव, 20 जुलै : संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे भाजपचे (bjp) नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा आज भीम पराक्रम जामनेरकरांना पाहण्यास मिळाला. जामनेरमध्ये एक भल्लामोठा साप (snake) अवतरला होता. पण, मोठे धाडस दाखवत महाजन यांनी साप पकडला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ( Girish Mahajan catches a big snake jamner jalgaon)
जामनेर नगर परिषदेच्या समोर रात्री साडे सात वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. मुख्य रस्त्यावर अचानक एक भलामोठा साप आढळून आला. साप साप म्हणता परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी परिषदेत गिरीश महाजन आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.
#जळगाव : भाजपचे नेते गिरीष महाजन यांनी पकडला भलामोठा साप pic.twitter.com/g3Z54a4VAf
— News18Lokmat (@News18lokmat) July 20, 2021
त्यानंतर महाजन यांनी हातात काठी घेतली आणि साप पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मदतीला एक कार्यकर्ता धावून आला. परिसरात अंधार झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी मोबाईलमधील टॉर्च ऑन केली. एका कार्यकर्त्याने सापाची शेपटी पकडली आणि त्याच क्षणी गिरीश महाजन यांनी सापाचे डोकं पकडलं.
टेलिकॉम कंपन्यांच्या कॉल्समुळे त्रस्त आहात? हे करून बघा नेहमीसाठी बंद होतील कॉल
सापाला पकडल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. 'भाऊ काय हिंमत केली तुम्ही' असं म्हणत कार्यकर्ते आणि स्थानिक लोकांनी महाजन यांचं कौतुक केलं. सुदैवाची बाब म्हणजे, हा साप बिनविषारी होता.
सापाला पकडल्यानंतर त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडून देण्यात आले आहे. पण, गिरीश महाजन यांच्या या धाडसामुळे जामनेरकरांनी कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Snake