मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दाऊदच्या पत्नीशी संबंध! हॅकरला का भेटले फडणवीस; एकनाथ खडसेंनी केला 'त्या' रात्रीचा खुलासा

दाऊदच्या पत्नीशी संबंध! हॅकरला का भेटले फडणवीस; एकनाथ खडसेंनी केला 'त्या' रात्रीचा खुलासा

एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले आहे.

एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले आहे.

एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले आहे.

भुसावळ, 6 सप्टेंबर: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पत्नीशी माझा संबंध असल्याचा आरोप करणारा हॅकर मनीष भंगाळे याला त्याच रात्री दीड वाजता देवेंद्र फडणवीस भेटले होते. एवढंच नाही तर ही भेट काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग यांनी घडवून आणली होती. त्या बदल्यात कृपाशंकर यांना विधान परिषदेचं सदस्यत्व देण्यात आल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. हेही वाचा...शरद पवारांच्या गाडीचं स्टिअरिंग आणखी एका नातवाच्या हाती... पाहा VIDEO आपण मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असल्याने आपल्याला राजकारणातून बाजूला करण्यात आल्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचं एकनाथ खडसेंनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले, काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग आणि देवेंद्र फडणवीस हे मनीष भंगाळेला भेटले त्याचा आपल्याकडे पुरावा आहेत. त्यांच्या भेटीची आपल्याकडे फोटो असल्याचं एकनाथ खडसे यांनी दावा केला आहे. कृपाशंकर सिंग यांच्यावर असलेले विविध गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. याशिवाय हॅकर मनीष भंगाळेवर आजपर्यंत कारवाई का झाली नाही? त्याच्यावर गुन्हे दाखल का केले नाही? या मागच कारण काय आहे, हे जाणून घ्यायचं असल्याचं खडसेंनी म्हटलं आहे. चार दिवसांच्या संसारावरून खडसेंची तोफ... दरम्यान, यापूर्वी एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस याच्यावर टीकेची तोफ डागली होती. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करू शकत नाही. कारण मुहुर्त साधत लग्न करून शपथ घेत तीन चार दिवस संसार करत ते मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री झाले होते. तीन-चार दिवस दुसऱ्याच्या घरात राहिल्यावर पतिव्रता आहोत, असं आम्ही म्हणू शकत नाही. कारण आता नैतिकता घालवल्या गेली आहे, अशा परखड शब्दांत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. हेही वाचा...कापड व्यापाऱ्याच्या मुलाच्या अपहरण नाट्याचा 24 तासांत उलगडा, समोर आलं ते भयंकर! एकनाथ खडसे यांनी सांगितलं की, देवेंद्र फडणवीस एकटेच लढत असून महाराष्ट्रभर फिरत आहे. पूर्वी आमचं टीम वर्क होतं. त्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर नितीन गडकरी यांच्या तोफ चालयचा तर अलीकडे माझासह पंकजा मुंडे, गिरीश बापट, विनोद तावडे, हरिभाऊ बागडे असा आमचा एकत्र ताफा होता. त्यामुळे सरकार घाबरून गांगारून जायचं. मात्र, आता महाराष्ट्रातली सर्व नेते मंडळी शांत बसलेली आहेत. जनतेनं निवडून दिलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेते अधून मधून बोलतात. मात्र जी आक्रमक भाषा पाहिजे, ती त्यांच्या कुठेच दिसत नाही. आम्ही कमी पडत आहोत, असं मतही एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: BJP, Dawood ibrahim, Eknath khadse

पुढील बातम्या