Home /News /maharashtra /

एकनाथ खडसेंनी खोडून काढली शरद पवारांची भूमिका, भीमा कोरेगावबद्दल म्हणाले...

एकनाथ खडसेंनी खोडून काढली शरद पवारांची भूमिका, भीमा कोरेगावबद्दल म्हणाले...

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    इम्तियाज अहमद, भुसावळ, 26 जानेवारी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भीमा कोरेगाव हिंसाचारावरून तत्कालीन फडणवीस सरकारसोबतच पुणे पोलिसांवरही टीका केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे (National Investigation Agency ) देण्यात आला आहे. याबाबत आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'शरद पवार साहेबांनी परवा वक्तव्य केलं होतं की भीमा कोरेगावची दंगल ही स्थानिक पोलिसांच्या मदतीने झाली आहे. असं जर पवार साहेबांनी म्हटलं असेल तर स्थानिक पोलीसच स्थानिक पोलिसांची चौकशी कसे करू शकते? त्यामुळे भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास NIA कडे देणे योग्य आहे. आक्षेप जर पोलिसांवर आहे तर वरिष्ठांकडून चौकशी करण्यात यावी,' अशी भूमिका एकनाथ खडसे यांनी घेतली आहे. 'सत्य बाहेर येण्याच्या भीतीमुळे NIA कडे तपास' 'सत्य बाहेर येण्याच्या भितीमुळे केंद्र सरकारने या प्रकरणात NIA कडे तपास दिला आहे,' असा घणाघाती आरोप शरद पवार यांनी केला आहे. 'कायदा व सुवव्यवस्था हे राज्य सरकारचं काम आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांनी तारतम्य ठेवलं नाही. एल्गार परिषदेत चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली. अन्यायाबद्दल बोलणं म्हणजे नक्षलवाद नव्हे. आम्ही एसआयटीची मागणी केल्यानंतर केंद्र सरकारने कुरघोडी केली आहे. सत्य बाहेर या भितीनं एनआयएकडे तपास,' असं पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले. VIDEO : शिवभोजनच्या उद्घाटनासाठी गेलेल्या अजित पवारांनी घेतली फिरकी, हसून-हसून सगळेच लोटपोट चंद्रकांत पाटलांकडून जोरदार समर्थन एल्गार परिषद गुन्ह्याचा तपास एनआयएकडे वर्ग करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी जोरदार समर्थन केलं आहे. तसंच आघाडीचे सरकारचे यासंबंधीचे आरोप म्हणजे निव्वळ कल्पनाविलास असल्याचं म्हटलं आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Eknath khadase, Sharad pawar

    पुढील बातम्या