राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? नागपुरात दाखल झालेल्या एकनाथ खडसेंनी दिलं उत्तर

राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? नागपुरात दाखल झालेल्या एकनाथ खडसेंनी दिलं उत्तर

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचीही चर्चा झाली.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, नागपूर, 18 डिसेंबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी जाहीर व्यासपीठावरूनही बोलून दाखवली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. तसंच काल रात्री नागपूरमध्ये एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचीही चर्चा झाली. या सगळ्याबाबत आता स्वत: एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

'काल माझी कोणाशीही भेट झालेली नाही, सर्व अफवा आहेत. आजही माझी कोणती भेट ठरलेली नाही. मी माझ्या खासगी आणि विधानभवनातील कामांसाठी नागपुरात आलो आहे. कोणत्याही प्रकारे पक्ष बदलण्याचा आज विषय नाही,' असं म्हणत एकनाथ खडसे यांनी पक्षांतराच्या चर्चेवर भाष्य केलं आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना किंवा इतर कोणालाही भेटू शकतो. पण त्याचा काही वेगळा अर्थ काढू नये, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

अमित शहांचा पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल, शरद पवारांबद्दलही केलं भाष्य

'समजूत काढण्याचा विषय नाही'

'माझं मन वळवण्याचा प्रश्नच येत नाही कारण मी कुठला निर्णयच घेतलेला नाही. निर्णय घेतला असता तर मन वळवण्याचा प्रश्न आला असता. माझा आमच्या पक्षातील वरिष्ठांशी कायम संपर्क असतो,' असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजपमधील दिल्लीतील नेते त्यांची समजूत काढत आहेत, याबाबतच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अजूनही पक्षावर नाराज आहे. वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत देणारे खडसे आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्यामुळे खडसे मोठा निर्णय घेण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विधानसभा निवडणुकीत आधी तिकीट न दिल्यामुळे खडसे नाराज होते. त्यानंतर मुलगी रोहिणी खडसे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. रोहिणी यांचा अवघ्या 3 हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे खडसे यांनी पक्षातील काही जणांनी यासाठी कामं केलं असा गंभीर आरोप केला होता. याबद्दल तसे पुरावे त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले होते. तसंच त्यांनी नावं जाहीर करण्यासाठी परवानगीही मागितली होती. परंतु, पाटील यांनी आश्वासन देऊन त्यांची मनधरणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2019 01:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading