मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एकनाथ खडसेंनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा, मुंबईतून जळगावला परतल्यानंतर नेमकं काय म्हणाले?

एकनाथ खडसेंनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा, मुंबईतून जळगावला परतल्यानंतर नेमकं काय म्हणाले?

मुंबईत एकनाथ खडसे हे शरद पवार यांना भेटणार असल्याची जोरदार चर्चा होती.

मुंबईत एकनाथ खडसे हे शरद पवार यांना भेटणार असल्याची जोरदार चर्चा होती.

मुंबईत एकनाथ खडसे हे शरद पवार यांना भेटणार असल्याची जोरदार चर्चा होती.

  • Published by:  Akshay Shitole

जळगाव, 11 ऑक्टोबर : भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असताना गेल्या पाच दिवसांपासून एकनाथ खडसे हे मुंबईत होते. मुंबईत एकनाथ खडसे हे शरद पवार यांना भेटणार असल्याची जोरदार चर्चा होती. आज एकनाथ खडसे मुंबईवरून जळगावमध्ये दाखल झाले.

जळगावच्या मुक्ताई निवासस्थानावर काही निवडक कार्यकर्त्यांशी खडसे यांनी संवादही साधला. मात्र मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली का? याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खडसे यांनी मौन पाळले. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. एकनाथ खडसे यांनी सध्या तरी राष्ट्रवादी प्रवेशावर भाष्य करणं टाळलं असलं तरीही ते पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा सुरूच आहेत.

खडसेंबाबत काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

'भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या नाराजीबाबत भाष्य केलं. 'आमच्या बैठकीत कार्यकारिणीचे सदस्य व्हीसीद्वारे होते. खडसे समजदार नेते आहेत, आमचे ते पालक आहेत, आम्ही त्यांचे पाल्य आहोत. एकनाथ खडसे पण एक माणूस आहेत, ते त्यांच्या भावना व्यक्त करतात. ते आमचे पालक आहेत. त्यांनी दोन थोबाडीत माराव्यात, पण ते दांडक्यासमोर का बोलतात?' असं म्हणत चंद्रकात पाटील यांनी खडसेंबाबत प्रतिक्रिया दिली होती.

खडसेंचं टायमिंग चुकलं?

राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेश कार्यालयात जळगाव जिल्ह्यातील बैठक काही दिवसांपूर्वी झाली. या बैठकीत भाजप नेते एकनाथ खडसे यांचा विषय निघणार नाही असं होणं शक्य नव्हतं. एकनाथ खडसे यांच्याविषयी चर्चा झाली आणि हल्ली खडसे करतात तरी काय? हा प्रश्न उपस्थित झालाच.

खडसे राष्ट्रवादीमध्ये येतील या शक्यतांवर माध्यमातून चर्चा रंगली. पण खडसे यांना आता राष्ट्रवादी प्रवेश देईल का? किंवा खडसे आता राष्ट्रवादीमध्ये जातील का? या शक्यता धूसर होत असल्याचं बोललं जात आहे. जर यदा-कदाचित ते राष्ट्रवादीत गेलेच तर त्यांना किती मानाचं स्थान असेल हा मुद्दा वादातच आहे.

विधानसभा 2019 ला एकनाथ खडसे यांना तिकीट देण्यास भाजपाने नकार दिला. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने खडसे यांना पक्षात येण्यास गळ घातली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार खडसे यांना घ्यायला निघाले देखील होते. पण ऐनवेळी भाजपनं एकनाथ खडसे यांच्या मुलीला विधानसभा उमेदवारी जाहीर केली आणि तिथेच खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश गुंडाळला गेला.

First published:

Tags: Eknath khadse, Sharad pawar