चौकशीप्रकरणी अडचण वाढवण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न, एकनाथ खडसे म्हणतात...

चौकशीप्रकरणी अडचण वाढवण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न, एकनाथ खडसे म्हणतात...

भाजपला घेरण्यासाठी महाविकास आघाडीकडून रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे.

  • Share this:

इम्तियाज अहमद, भुसावळ, 23 फेब्रुवारी : मागील सरकारच्या काळात काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्यानंतर काही काळातच त्यांना क्लीनचिट देण्यात आली. या मुद्यावर भाजपला घेरण्यासाठी महाविकास आघाडीकडून रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. यामध्ये भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे, प्रकाश मेहता, जयकुमार रावल आणि विष्णू सावरा यांना क्लीनचीट देण्यात आली. तर एकनाथ खडसे यांची चौकशी लावण्यात आली होती. या सर्व प्रकरणाचा अहवाल आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात आणण्यात येणार असल्याची माहिती आहे. याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'माझ्यावर आक्षेप घेण्यात आलेला होता आणि त्यानुसार झोटिंग कमिटी नियुक्त केली होती. झोटिंग समितीने आपला अहवाल विधानमंडळामध्ये दिला. या अहवालानुसार अँटी करप्शनकडे गुन्ह्याची नोंद नोंदवून त्याची पूर्ण चौकशी झालेली आहे. अँटीकरप्शननेही आपला अहवाल न्यायालयामध्ये क्लोजर म्हणून सादर केलेला आहे. या अहवालात भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत कुठले तथ्य नसल्याचे म्हटले आहे,' असं म्हणत एकनाथ खडसे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

वारिस पठाण यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून मनसेने मारले जोडे

'या प्रकरणामध्ये माझा कसा संबंध आला याची मला कल्पना नाही. एक रुपयांचा व्यवहार मी या प्रकरणांमध्ये केलेला नाही. जमीन मी स्वतः खरेदी केलेली नाही. व्यवहार झालेला आहे तो माझ्या कुटुंबाकडून झालेला आहे. त्यामुळे जर आगामी काळात पुन्हा विधानभवनात अहवाल आणण्यात आला तर त्यात माझ्यावर नवे कोणते आक्षेप घेतले जातात, याची मलाही उत्सुकता आहे,' असं उपरोधिक भाष्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

First published: February 23, 2020, 5:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading