माझ्याकडे साधनसामग्री नाही, शरद पवारांच्या त्या वक्तव्यावर एकनाथ खडसे काय म्हणाले?

शरद पवार यांनी खडसे यांच्याबाबत एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती.

  • Share this:

इम्तियाज अहमद, जळगाव, 22 डिसेंबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण एकनाथ खडसे यांनी पक्षातील आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. तसंच एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू असल्याची माहिती आहे. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडसे यांच्याबाबत एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती.

'एकनाथ खडसे यांच्यासोबत माझी चर्चा झाली. मात्र त्यांचं समाधान करण्याइतपत साधनसामुग्री माझ्याकडे नाही,' असं म्हणत शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण केला. याबाबत विचारलं असता एकनाथ खडसे यांनी मौन बाळगणं पसंत केलं. त्यामुळे एकनाथ खडसे आगामी काळात नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

'त्या बातम्या चुकीच्या'

'आपण पक्ष चालवला आहे. त्यामुळे आपल्याला माहीत आहे की कोणत्याही पक्षाला अशी पाच दिवसाची मुदत देता येत नाही. त्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो. त्यामुळे आपल्याला त्रास देणाऱ्यांवर पाच दिवसात कारवाई नाही झाल्यास आपण पक्ष बदलणार ही माध्यमांच्यामध्ये येणारी बातमी चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे,' असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीबद्दल एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार नक्की काय म्हणाले होते?

भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असताना शरद पवार यांनी मोठे विधान केलं. 'एकनाथ खडसे हे मला भेटले होते. त्यांच्याशी माझी चर्चाही झाली. पण त्यांचे समाधान करण्याएवढी साधनसामुग्री सध्या तरी माझ्याकडे नाही,' असे सांगून शरद पवार यांनी खडसेंनाच धक्का दिला.

औरंगाबादमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे खडसे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत पत्रकारांनी शरद पवार यांना त्याबाबत विचारला असता त्यांनी चर्चेतील हवाच काढून टाकली. खडसे हे मला भेटले होते. माझी त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. मात्र, त्यांचे समाधान करण्याइतपत साधनसामुग्री माझ्याकडे नसल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 22, 2019 04:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading