एकनाथ खडसेंसाठी 11 मार्च ठरणार महत्त्वाची तारीख! मोठा निर्णय होण्याची शक्यता

एकनाथ खडसेंसाठी 11 मार्च ठरणार महत्त्वाची तारीख! मोठा निर्णय होण्याची शक्यता

एकनाथ खडसेंना राज्यसभेत पाठवण्यासाठी राज्यातील नेते आग्रही आहेत.

  • Share this:

मुंबई, 9 मार्च : भाजप नेते एकनाथ खडसे यांचे राजकीय भवितव्य 11 मार्चनंतर ठरणार असल्याची माहिती आहे. एकनाथ खडसेंना राज्यसभेत पाठवण्यासाठी राज्यातील नेते आग्रही आहेत. मात्र स्वतः खडसे विधान परिषदेत जाण्यास उत्सुक असल्याची माहिती आहे. मात्र तूर्तास दिल्लीतील भाजप नेतृत्वाचा या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही.

एकनाथ खडसे यांचं नाव राज्यसभेसाठी चर्चेत आल्याने ते खरंच दिल्लीत जाणार का, याविषयीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र राज्यातील भाजप नेत्यांमध्ये नेतृत्वावरून सुरू असलेल्या संघर्षामुळेच खडसेंना दिल्लीत पाठवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो, असं बोललं जात आहे. मात्र याबाबतचा कोणताही अंतिम निर्णय अद्याप झाला असून याविषयीची ठोस माहिती 11 मार्चलाच मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातलं राजकीय गणित बदलल्याने त्याचा फटका भाजपला बसणार असून महाविकास आघाडीचे जास्त उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. तर भाजपचे फक्त दोन सदस्य निवडून येऊ शकतात. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 26 मार्च 2020 ला निवडणूक होणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. संसदेचे स्थायी सभागृह असणाऱ्या राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 (2,9 आणि12 एप्रिल) मध्ये संपत आहे. वरिष्ठ सभागृहात महाराष्ट्रातील एकूण 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2020 ला संपत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

हेही वाचा-ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, राज ठाकरेंनी दिला इशारा

असा असणार निवडणूक कार्यक्रम

महाराष्ट्रासह 17 राज्यांच्या राज्यसभेतील 55 जागांसाठी 26 मार्च 2020 ला मतदान घेण्यात येणार आहे. 6 मार्चला निवडणूक अधिसूचना जारी होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 मार्च असून 16 मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 18 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर 26 मार्च ला सकाळी 9 ते दुपारी 4 वाजे दरम्यान मतदान घेण्यात येणार तर दुपारी 5 वाजता मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल.

विधानसभा निवडणुकीत आणि भाजपमधील नाराजी

विधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यानंतर या नाराज नेत्यांनी भाजपच्या राज्य पातळीवरील नेतृत्वाला लक्ष्य केलं होतं.

First published: March 9, 2020, 4:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading