Home /News /maharashtra /

भाजपमध्ये फुट पडणार, एकनाथ खडसे संपर्कात, शिवसेनेच्या आमदाराचा गौप्यस्फोट

भाजपमध्ये फुट पडणार, एकनाथ खडसे संपर्कात, शिवसेनेच्या आमदाराचा गौप्यस्फोट

जळगाव जिल्हा परिषदेवर एकनाथ खडसे यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे ही जिल्हा परिषद भाजपच्या हातातून हिसकावून घेण्यासाठी शिवसेनेने कंबर कसलीय. नाराज असलेल्या खडसेंची शिवसेनेला साथ मिळण्याची शक्यता आहे.

  जळगाव 01 जानेवारी : विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरून वातावरण तापलंय. जळगाव जिल्हा परिषदेवर एकनाथ खडसे यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे ही जिल्हा परिषद भाजपच्या हातातून हिसकावून घेण्यासाठी शिवसेनेने कंबर कसलीय. भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसेंची शिवसेनेला साथ मिळण्याची शक्यता असून शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी तसे संकेत दिले आहेत. एवढच नाही तर त्यांनी एक मोठा गौप्यस्फोटही केलाय. नाथाभाऊ हे आपल्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे पुढच्या काही काळात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. गुलाबराव पाटील म्हणाले, जिल्हा परिषद ही शिवसेनेच्या ताब्यात येणार आहे. अनेक लोक आमच्या संपर्कात असून त्याबाबात जास्त काही आताच सांगणार नाही. आत्तापर्यंत खडसे हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होतं. खडसे यांनी याआधी शरद पवार यांच्याशी काही वेळा भेटी घेऊन चर्चाही केली होती. नाराजू दूर करण्याचा प्रयत्न, पण... भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासून नाराज असलेले एकनाथ खडसे आता बंडाच्या पावित्र्यात आहेत. गेल्या काही दिवसांपासून तर त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्यास भाग पाडू नका असा इशाराच पक्षश्रेष्ठींना दिला होता. गोपीनाथ गडावर झालेल्या भाषणात त्यांनी अतिशय स्पष्टपणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. महाराष्ट्रातली सत्ता गेल्याने भाजप आधीच अडचणीत आहे. झारखंडही हातातून गेलाय. या पार्श्वभूमीवर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता थेट दिल्लीतून सूत्र हलली असून भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी खडसेंशी चर्चा करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

  आश्चर्य...कोकणातल्या जंगलात दुर्मिळ 'वनमानव', वाचून थक्क व्हाल थक्क

  चर्चेसाठी नाराज खडसेंना खास दिल्लीत काही दिवसांपूर्वी बोलावण्यात आलं होतं. नड्डा यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ही चर्चा राज्यातल्या राजकारणावर झाली असून त्यांना मी सगळी वस्तूस्थिती सांगितली. त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक होता अशी माहिती खडसे यांनी दिली. पक्षश्रेष्ठींनी कारवाई केल्यावरच त्यांना मी किती समाधानी झालो हे कळेल असंही खडसे यांनी सांगितलं.

  काँग्रेसला धक्का, मंत्रिपद नाकारल्याने दिग्गज आमदार सोडणार पक्ष

  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण एकनाथ खडसे यांनी पक्षातील आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. तसंच एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू असल्याची माहिती आहे. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी खडसे यांच्याबाबत एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Eknath khadse

  पुढील बातम्या