शरद पवारांचा दावा खडसेंनी फेटाळला; म्हणाले, मी राष्ट्रवादीच्या संपर्कात नाही

शरद पवारांचा दावा खडसेंनी फेटाळला; म्हणाले, मी राष्ट्रवादीच्या संपर्कात नाही

मी शरद पवारांच्या संपर्कात नाही. गेल्या तीन वर्षात शरद पवारांशी माझी भेट झालेली नाही. केवळ अफवा पेरण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

  • Share this:

इम्जियाज अहमद, मुक्ताईनगर, 03 ऑक्टोंबर : भाजपच्या दुसऱ्या यादीतही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव नसल्याने त्यांचा पत्ता कट होणार हे आता निश्चित समजलं जातंय. आपल्याला तिकीट मिळणार नाही हे समजल्याने खडसेंनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचं आवाहन केलं. एकनाथ खडसे यांच्या फार्महाऊसवर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. भुसावळ ते विद्यमान आमदार संजय सावकारे एकनाथ खडसे सोबत होते. भाजपकडून अद्यापही उमेदवारी जाहीर न झाल्याने कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. आमदार संजय सावकारे सुद्धा यावेळी गहिवरले.

नंतर बोलताना खडसे म्हणाले, मी शरद पवारांच्या संपर्कात नाही. गेल्या तीन वर्षात शरद पवारांशी माझी भेट झालेली नाही. केवळ अफवा सोडण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

खडसे यांच्या बंगल्याबाहेर काही कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा इशाराही दिला असून एकनाथ खडसे यांनी त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कुठे कार्यकर्ते शांत झाले.

राज्याच्या राजकारणाला कलाटणी, बीडचा दौरा रद्द करून अजित पवार खडसेंच्या भेटीला?

पवारांनी काय केला गौप्यस्फोट?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ED प्रकरणानंतर आता आक्रमक झालेत. आज ठाण्यात त्यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय आणि एक मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले एकनाथ खडसे हे गेल्या काही महिन्यांपासून संपर्कात आहेत. मात्र त्यांचं पक्षात येण्याबाबात अजुन निश्चित काही सांगता येत नाही. ते काय पर्याय शोधतील हे आत्ताच काही सांगता येत नाही. पर्याय हा लगेच तयार होत नसतो. पवारांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. त्यातच अजित पवार हे बीडचा दौरा अर्धवट सोडून आज नाथाभाऊंच्या भेटीसाठी गेले त्यामुळे मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

VIDEO: वरळी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध होणार? उद्धव

मुख्यमंत्र्यांवरही निशाणा

पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आपल्यावरील गुन्हे लपवले. याबाबत प्रकरण न्याय प्रविष्ट आहे हे खरं आहे. मात्र त्यांनी दिली पाहिजे होती. सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. मुलभूत स्वातंत्र्यावर गदा आणली जातेय. कलम 370 आणि राम मंदीर मुद्दा सत्ताधारी निवडणुकीच्या वेळीच काढतात. कारण लोकं त्यांच्यावर नाराज असतात तेव्हा भावनिक मुद्दे काढले जातात. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या असे अनेक मुद्द आहेत ज्यावर सत्ताधारी उत्तर देऊ शकत नाही त्यामुळे असे मुद्दे काढले जातात. EDच्याअधिका-यांना वरुन सुचना आल्या असतील असंही पवार म्हणाले.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 3, 2019, 3:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading