संपूर्ण गावच केलं सील जळगाव शहरातील मेहरूण परिसरात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णावर कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णावर जामनेर तालुक्यातील नाचणखेडे येथील डॉक्टरांनी उपचार केले होते. त्यामुळे आरोग्य विभागाने रुग्णाच्या संपर्कातील त्याची जामनेर येथील बहीण व उपचार करणाऱ्या डॉक्टरला उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे तर प्रशासनाने खबरदारी म्हणून नाचणखेडा गाव सील केले आहे. हेही वाचा...कोरोनाच्या लढ्यासाठी केवळ महिन्याचा नाही, माझा संपूर्ण वर्षाचा पगार घ्या दुसरीकडे, महाराष्ट्रात एका दिवसात 72 कोरोनाव्हायरसचे नवे रुग्ण दाखल झाले आहेत. ही एका दिवसातली आतापर्यंतची सर्वांत मोठी संख्या आहे. देशभरात कुठल्याही एका राज्यात एकदम एवढ्या संख्येने रुग्णांमध्ये वाढ झालेली नाही. आता राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 302 झाला आहे. आजचा दिवस राज्यासाठी धक्कादायक ठरला. संपूर्ण राज्य लॉकडाउन असतानाही एकदम 72 ने रुग्णसंख्या वाढली. 230 वरून आकडा थेट 302 झाला आहे. एकट्या मुंबई आणि परिसरात (MMR)67 रुग्ण वाढले आहेत. ही एका दिवसातली आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. यातले खुद्द मुंबईतले 59 रुग्ण आहेत. तर पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वाशी, विरार इथे प्रत्येकी 2 रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्याचा एकूण आकडा 72 ने वाढला आहे.एकनाथ खडसेंनी स्वतः ट्रॅक्टर चालवून केली औषध फवारणी LIVE VIDEO pic.twitter.com/gW4gKgGqDE
— News18Lokmat (@News18lokmat) March 31, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath khadse