भाजपमधून बंडखोरीच्या तयारीत असलेल्या खडसेंना शिवसेनेकडून अद्याप वेळ नाही!

भाजपमधून बंडखोरीच्या तयारीत असलेल्या खडसेंना शिवसेनेकडून अद्याप वेळ नाही!

एकनाथ खडसे अजूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निरोपाच्या प्रतीक्षेत आहेत.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून अजूनही खडसे यांना भेटीची वेळ कळविण्यात आली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ खडसे अजूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निरोपाच्या प्रतीक्षेत आहेत.

एकनाथ खडसे यांनी काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून अजूनही भेटीची वेळ कळवण्यात आलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे-एकनाथ खडसे ही भेट होणार, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.

एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला

भाजपमध्ये ज्येष्ठ नेत्यांची नाराजी वाढताना दिसत आहे. यामध्ये फक्त एकनाथ खडसे यांचाच नाही तर पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे. विधानसभेतील पराभवानंतर आता पंकजा मुंडे पक्षातून बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सध्या एकनाथ खडसे पंकजा मुंडे यांच्या भेटीला गेले आहेत. रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी एकनाथ खडसे-पंकजा मुंडे यांची भेट होणार आहे.

भाजपमध्ये का वाढत आहे धूसफूस?

विधानसभा निवडणुकीत भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेतृत्व दिलं होतं. भाजपचा संपूर्ण प्रचार देवेंद्र फडणवीस यांच्याभोवतीच फिरत राहिला. त्यातच मुक्ताईनगरमधून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, बोरिवलीतून विनोद तावडे, घाटकोपरमधून प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे अशा दिग्गज नेत्यांचं तिकीट कापण्यात आलं. विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेसोबत वाद झाल्याने भाजपला राज्यातील सत्ता गमवावी लागली. सत्ता गमावल्यानंतर भाजपमधील नाराजांनी डोकं वर काढलं आहे. त्यामुळे हे नाराज नेते खरंच भाजप सोडणार का, हे पाहावं लागेल.

Published by: Akshay Shitole
First published: December 10, 2019, 1:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading