विधानसभेत नसणं ही आयुष्यभराची खंत, खडसेंनी पुन्हा व्यक्त केलं मनातलं दु:ख

विधानसभेत नसणं ही आयुष्यभराची खंत, खडसेंनी पुन्हा व्यक्त केलं मनातलं दु:ख

'विधानसभेत मी माझ्या आयुष्याचा मोठा काळ विरोधीपक्ष नेता म्हणून घालवला आहे. त्या काळात जनतेचे प्रश्न धसास लावले त्यामुळे आजच्या विरोधी पक्षांची स्थिती पाहून खंत वाटते.'

  • Share this:

मुक्ताईनगर 23 ऑक्टोंबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे या विधानसभा निवडणुकीत उमेदवाराच्या नाही तर प्रचारकाच्या भूमिकेत होते. गेली 40 वर्ष विधानसभेच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या खडसेंना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिली नाही त्यावरून वादळही निर्माण झालं. खडसे ऐवजी त्यांची मुलगी रोहिणी यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे खडसे हे विधानसभेच्या राजकाणातून बाजूला फेकले गेले. याची खंत आणि दु:ख खडसेंना अजुनही आहे. 2019 च्या निवडणुकीनंतर विधानसभेत नसणं याची खंत मला आयुष्यभर राहिल अशी भावना खडसे यांनी व्यक्त केली. या निवडणुकीत भाजपला 140 जागा मिळतील असंही ते म्हणाले.

माजी उपमुख्यमंत्र्यांच्या साखर कारखान्याचा लिलाव, विरोधकानेच जिंकली बोली

खडसे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक बहुमत मिळेल. पक्ष पुन्हा सत्तेवर येईल. मात्र त्यात मी नसणार आहे. भाजपला बहुमत मिळत असताना विरोधी पक्ष मजबूत नसणं हे दुर्दैवी आहे असंही ते म्हणाले. विधानसभेत लोकांसाठी काम करता आलं असतं तर मला आनंद झाला असता. विधानसभेत मी माझ्या आयुष्याचा मोठा काळ विरोधीपक्ष नेता म्हणून घालवला आहे. त्या काळात जनतेचे प्रश्न धसास लावले त्यामुळे आजच्या विरोधी पक्षांची स्थिती पाहून खंत वाटते असंही ते म्हणाले.

निकालाआधीच लागले रोहित पवारांच्या विजयाचे होर्डींग्ज्

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या (गुरुवारी)सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटांत पहिला कल हाती येईल. त्यानंतर कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार आघाडीवर आणि कोणता उमेदवार पिछाडीवर आहे, हे कळण्यास सुरुवात होईल. मतमोजणी सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर दुपारी 1 च्या आसपास मतदारसंघाचा निकाल येण्याची शक्यता आहे.

सावधान...मतमोजणीनंतर महाराष्ट्रात येणार चक्रीवादळ!

निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्षातील उमेदवारांनी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचं पाहायला मिळालं. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर प्रचाराच्या मैदाना अनेक आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले. त्यानंतर 21 ऑक्टोबर मतदान झाल्यानंतर सर्व उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. आता उद्या मतमोजणी असलेल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीही धाकधूक वाढल्याचं चित्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2019 09:50 PM IST

ताज्या बातम्या