लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी
नाशिक, 08 जानेवारी : नाशिक महानगर पालिका निवडणुकीच्या (nashik municipal corporation election) तोंडावर भाजपला (BJP) एकापाठोपाठ आता तिसरा धक्का बसला आहे वसंत गीते (Vasant geete), सुनिल बागुल (Sunil bagul) यांच्या पाठोपाठ भाजपचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील (Dinkar Patil) सुद्धा सेनेच्या (Shivsena) वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. दिनकर पाटील हे आपल्या 11 समर्थक नगरसेवकांसह सेनेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सत्तेत असलेले भाजप अल्पमतात जाण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी भाजपने फोडोफाडी करून शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना आपल्या तंबूत आणले. त्यामुळे खवळलेल्या शिवसेनेनं भाजपला जोरदार धक्का देण्याची तयारी केली आहे. भाजपचे माजी आमदार वसंत गीते आणि भाजप प्रदेशउपाध्यक्ष सुनील बागुल आज शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यांच्यापाठोपाठ आता दिनकर पाटीलही सेनेच्या तंबूत दाखल होणार आहे. दिनकर पाटील यांनी भाजपच्या 4 नगरसेवकांसह प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहे.
IND vs AUS: बुमराहनं केली स्मिथची नक्कल, तुम्ही हा VIDEO पाहिला का?
दिनकर पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीमुळे दिनकर पाटील यांचा सेनेत प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजत आहे. एवढंच नाहीतर भाजपचे 11 विद्यमान नगरसेवक सुद्धा सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सभागृहात, सत्ताधारी भाजप अल्पमतात जाण्याचे संकेत मिळत आहे. हा भाजपला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
त्याआधी माजी आमदार वसंत गीते आणि भाजप प्रदेशउपाध्यक्ष सुनील बागुल यांनी गुरुवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची नाशिकमधील हॉटेल एक्स्प्रेस इन येथे भेट घेतली. त्या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे.
धोनीचं IPL मधून 150 कोटी कमावणं निश्चित, बनवणार नवा विश्वविक्रम
त्यानुसार आज संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास सुनिल बागुल आणि वसंत गीते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी या दोन्ही नेत्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे आणि युवासेनेचे नेते वरूण सरदेसाई देखील उपस्थित होते. सुनिल बागुल आणि वसंत गीते दोनही नेते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची आज पुन्हा घरवापसी होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sanjay raut, संजय राऊत