Home /News /maharashtra /

आता पहाटे शपथविधी होणार नाही, होईल तर..., फडणवीसांचे खुमसदार उत्तर

आता पहाटे शपथविधी होणार नाही, होईल तर..., फडणवीसांचे खुमसदार उत्तर

भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भल्यापहाटे शपथविधी घेऊन राज्याच्या राजकारणात एकच भूकंप घडवला होता.

    औरंगाबाद, 23 नोव्हेंबर : भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भल्यापहाटे शपथविधी घेऊन राज्याच्या राजकारणात एकच भूकंप घडवला होता. पण, 'आता पहाटे शपविधी घेण्याची गरज पडणार नाही. जो काही शपथविधी घ्यायचा आहे, तो योग्य वेळी घेतला जाईल' अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. औरंगाबाद पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी पहाटेच्या शपविधी सोहळ्याला वर्षपूर्ती झाल्यावर विचारले असता त्यांनी खुमसादार उत्तर दिले. 'जे झाले ते झाले. पण आता तुम्हाला ज्यावेळी शपथविधी पाहण्यास मिळेल तेव्हा पहाटेची वेळ नसणार आहे. योग्य वेळी शपथविधी पाहण्यास मिळणार आहे. त्या  अडीच दिवसांच्या सोहळ्यावर पुस्तक लिहण्याचे काम सुरू आहे' असे उत्तर फडणवीस यांनी दिले. तसंच, 'असल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नसत्या', असं  फडणवीस म्हणताच पत्रकार परिषदेत एकच हश्या पिकली. 'चंद्रकांत पाटील जे काही बोलले होते, त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार यांच्या विधानाचे विपर्यास केले गेले, असं त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपला आहे' असंही फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर, 'ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा ज्येष्ठ नेते आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सुद्धा त्यांच्याबद्दल बोलत असता. त्यावेळेस त्यांना काही वाटत नाही. पण, त्यामुळे दुसऱ्या नेत्याकडे आपण जर बोट करत असाल तर चार बोटं आपल्याकडे हे लक्षात ठेवा',असा सल्लावजा टोलाही फडणवीस यांनी लगावला. 'वीज बिल आंदोलनात भाजपला पाठिंबा मिळत आहे. आताचे जे सरकार आहे. त्यांच्याविरोधात जनतेत नाराजी पसरली आहे. त्यांनी कितीही स्वप्न पाहिले तरी त्यांना माहिती आहे.  जनतेनं त्यांना निवडून दिलेले नाही. हे बेईमानने आलेले सरकार आहे' असं म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. 'बिअर बार उघडले, मॉल उघडले, बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत नाही का, मग मंदिर उघडल्यावर नेमका कोरोना कसा वाढणार आहे. असं म्हणणे चुकीचे आहे. जर मंदिरांमध्ये सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले गेले नाहीतर नक्की कारवाई करून मंदिर बंद करावी' असंही फडणवीस म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या