• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • फडणवीसांचे 'ते' कृत म्हणजे देशद्रोह, नाना पटोलेंची गुन्हा दाखल करण्याची मागणी

फडणवीसांचे 'ते' कृत म्हणजे देशद्रोह, नाना पटोलेंची गुन्हा दाखल करण्याची मागणी

'माजी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी इरफान नावाच्या व्यक्तीला बनावट नोटा चलनात आणण्यासाठी राज्यात आणले होते'

'माजी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी इरफान नावाच्या व्यक्तीला बनावट नोटा चलनात आणण्यासाठी राज्यात आणले होते'

'माजी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी इरफान नावाच्या व्यक्तीला बनावट नोटा चलनात आणण्यासाठी राज्यात आणले होते'

  • Share this:
गोंदिया, 13 नोव्हेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणावरून (mumbai drug case) राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी आरोपांची मालिका लावून भाजपच्या गोटात एकच खळबळ उडवून दिली. तर, 'माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी बनावट नोटांसाठी ज्या माणसाला इथं आणले त्यांचा अर्थ दोघांनी राष्ट्रद्रोह केला, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा' अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केली आहे. आज गोंदिया येथे काँग्रेस मेळावा पार पडला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांचा दाखल देत भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. 'ईडी आमच्यावर लावतात म्हणून काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी आमचेच मित्र पक्ष याची सुपारी घेत असल्याचे आपण पाहतो. या पद्धतीच्या चौकशा करून प्रतिमा मलिन करण्याचे काम केले जात आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. बॉयकॉट आणि अटकेच्या चर्चेत बिनधास्तपणे पार्टीत डान्स करताना दिसली कंगना तसंच, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या एका मंत्र्यावर (नवाब मलिक) आरोप केले. अंडरवर्ल्डच्या कडून जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर  त्याच मंत्र्याने माजी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी इरफान नावाच्या व्यक्तीला बनावट नोटा चलनात आणण्यासाठी राज्यात आणले होते. यामुळे त्या दोघांनी राष्ट्रद्रोह केल्याचे होत आहे. त्यामुळे काँग्रेसने सरकारला विनंती केली की या प्रकरणात चौकशी करून दोघांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,असं पटोले यांनी सांगितलं. जगातील सर्वात 'Premature Baby’ होऊन या बाळाने रचला इतिहास; 21व्या आठवड्यात जन्म तसंच, आरोप प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे. महाराष्ट्राचे राजकारण गुन्हेगारीकडे जात आहे. हे आता कुठे तरी थांबले पाहिजे, असंही पटोले म्हणाले.
Published by:sachin Salve
First published: