देवेंद्र फडणवीसही उतरले मैदानात! शरद पवारांच्या बारामतीपासून करणार दौऱ्याला सुरूवात

देवेंद्र फडणवीसही उतरले मैदानात! शरद पवारांच्या बारामतीपासून करणार दौऱ्याला सुरूवात

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झालं आहे. आस्मानी संकटांमुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 17 ऑक्टोबर: राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झालं आहे. आस्मानी संकटांमुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.

नुकसानग्रस्त शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे येत्या 19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा दौरा करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीपासून सुरूवात होणार आहे.

हेही वाचा...दसरा मेळाव्याचं उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरूनच, संजय राऊतांच मोठं विधान

असा असेल दौरा...

देवेंद्र फणडवीस आपल्या दौऱ्याला 19 ऑक्टोबरला बारामतीपासून प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी 20 ऑक्टोबरला उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत.

तिसर्‍या दिवशी 21 ऑक्टोबरला रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत 9 जिल्ह्यांमध्ये सुमारे 850 किलोमीटरचा प्रवास ते करणार आहेत.

दुसरीकडे, हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार हे अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करणार आहे. शरद पवार हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तुळजापूर, उमरगा,औसा, परांडा, उस्मानाबाद भागाची पाहणी करणार आहे. उद्या अर्थात 18 ते 19 ऑक्टोबर दौरा करणार आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेताची पाहणी करणार आहे. पहिल्या टप्प्यात हा त्यांचा दौरा असणार आहे.

परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूरमध्ये पावसामुळे हाहाकार उडाला आहे. शेतकऱ्याच्या समोर ऐन हंगामात हातात आलेले पिकं डोळ्यसमोर पाण्यात वाहून गेले आहे.

कोरोनाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर अतिवृष्टीचे संकट कोसळले आहे. राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे बळीराजाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली सोन्यासारखी ऊस, कापूस, तांदूळ, सोयाबीनची पिकं पाण्यात वाहून गेली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी अतिवृष्टी भागाचा आढावा घेतला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाड्याचा दौरा करण्याचे नियोजन केले आहे.

राज्यावर जेव्हा जेव्हा संकट परिस्थिती निर्माण झाली तेव्हा तेव्हा शरद पवार यांनी नेतृत्त्वाची कमान आपल्या हाती घेतली आहे. राज्यात कोरोनाची परिस्थितीत चिंताजनक आहे. पण, अशाही परिस्थितीत कोरोनाची तमा न बाळगता शरद पवार यांनी राज्यातील वेगवेगळ्या भागात जावून पाहणी केली.

हेही वाचा..देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा राज्य सरकारचा डाव, भाजप नेता आक्रमक

कोरोनाच्या काळात शरद पवार यांनी पुण्यात अनेक बैठका घेतला होत्या. मुंबईनंतर पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल, याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे लक्ष ठेवून आहे. दुसरीकडे शरद पवार यांनीही वेळोवेळी पुण्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य त्या सुचना दिल्या आहे. पुण्यासह मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील भागाची पाहणी केली होती.

Published by: Sandip Parolekar
First published: October 17, 2020, 3:11 PM IST

ताज्या बातम्या