Home /News /maharashtra /

प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाईवर देवेंद्र फडणवीस म्हणाले...

प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाईवर देवेंद्र फडणवीस म्हणाले...

'ईडीने जर छापा टाकला असेल तर त्यांच्याकडे काही तरी माहिती असेल, काही तक्रारी असतील. त्याशिवाय ईडी छापा टाकत नाही'

    सोलापूर, 24 नोव्हेंबर : (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरावर आणि कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या  (Enforcement Directorate (ED) पथकाने छापा टाकला आहे. या कारवाईमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटला आहे. 'जर चूक काही नसेल तर घाबरण्याचे कारण नाही. मात्र, चूक केली असेल तर संबंधित तपास यंत्रणा योग्य ती कारवाई करेल' अशी प्रतिक्रिया भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईवर सावध प्रतिक्रिया दिली. 'ईडीने जर छापा टाकला असेल तर त्यांच्याकडे काही तरी माहिती असेल, काही तक्रारी असतील. त्याशिवाय ईडी छापा टाकत नाही. मी सध्या सोलापूर दौऱ्यावर त्यामुळे सविस्तर माहिती नाही' असं म्हणत फडणवीस यांनी ईडीच्या कारवाईचे स्वागत केले. तसंच, 'जर चूक काही नसेल तर घाबरण्याचे कारण नाही. मात्र, चूक केली असेल तर संबंधित तपास यंत्रणा योग्य ती कारवाई करेल' असंही फडणवीस म्हणाले. तर . भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी असं म्हटले आहे की,  'राजकीय सूडापोटी अशाप्रकारे कोणतही कारवाई करण्याचं कारण नाही आहे. ईडी स्वतंत्र स्वायत्त आहे, कायद्याने दिलेल्या चौकटीत ते कारवाई करतात.' या कारवाईशी भारतीय जनता पार्टीचा काय संबंध आहे असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे. तर दुसरीकडे 'जर ईडीकडे काही तक्रारी आल्या असतील, तर त्यांनी केलेली त्यांच्या स्तरावरील ती कार्यालयीन कारवाई आहे. त्याच्याशी भाजपाचा संबंध असण्याचे काही कारण नाही आहे. असं असतं तर सरसकट झालं असतं, स्वैराचार माजला असता. त्यामुळे मला वाटत नाही असं जाणीवपूर्वक काही केलं आहे. यथावकाश यातील सत्य बाहेर येईल.'  राजकीय सूडबुद्धीने अशाप्रकारची कारवाई झाली नसल्याची प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी  दिली. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सेनेवर टीका केली आहे. 'शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या परिवाराच्या अनेक कंपन्यांवर ईडीने धाड टाकली आहे. जर बोगस कंपन्या असतील, भ्रष्टाचाराचा पैसा असेल तर कारवाई व्हायलाच हवी. शिवसेना आणि त्यांचे मोठे नेते आहेत, जे मुख्य आहेत त्यांच्या परिवारांच्या उद्योगांबाबत सर्वांना माहित आहे. ईडीच्या कारवाईचं स्वागत आहे,' असं म्हणत किरीट सोमय्या यांनी  सेना नेत्यांवर निशाणा साधला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या