Home /News /maharashtra /

मुंबईतील 'कराची स्वीट्स' मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक दिवस...

मुंबईतील 'कराची स्वीट्स' मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक दिवस...

'हे सर्व ढोंगी धर्मनिरपेक्ष लोक आहेत. हिंदूंवर हल्ले करणे आणि त्यांना शिव्या देणे म्हणजे धर्मनिरपेक्षता'

    नागपूर, 21 नोव्हेंवर: मुंबईतील (Mumbai) वांद्रे (Bandra)येथील प्रतिष्ठित 'कराची स्वीट्स'च्या (karachi sweets) नावावरून शिवसेनाविरुद्ध मनसे असा सामना रंगला आहे. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'अखंड भारतावर आमचा विश्वास आहे, एक दिवस कराची भारताचा भाग असेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. हेही वाचा...अमरत्त्व मिळवण्याच्या नादात मामाभाच्यासह तीन तरुणांनी गमावला जीव, धक्कादायक घटना देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात ‘लव्ह जिहाद’ च्या घटना घडत आहेत, त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी कायदा आणणे आवश्यक आहे. ते कॉंग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या आरोपासंदर्भात एका प्रश्नाला उत्तर देत होते. गेहलोत यांनी भाजपवर लव्ह जिहाद हा शब्द तयार करण्याचा आणि जातीय सलोखा बिघडविण्याचा आरोप केला होता. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'हे सर्व ढोंगी धर्मनिरपेक्ष लोक आहेत. हिंदूंवर हल्ले करणे आणि त्यांना शिव्या देणे म्हणजे धर्मनिरपेक्षता, असे त्यांचे मत आहे.' ते म्हणाले, "देशात लव्ह जिहाद चालू आहे आणि केरळमध्येही भाजपाची सत्ता नसतानाही हे स्वीकारले गेले आहे." फडणवीस पुढे, "जेव्हा अशा गोष्टी उद्भवतात तेव्हा कायदे करणे ही सरकारची जबाबदारी बनते." काही भाजपा शासित राज्यांनी तथाकथित लव्ह जिहाद रोखण्यासाठी योजना आखल्या आहेत. दरम्यान, RSS आणि BJP च्या अनेक नेत्यांनी यापूर्वी 'अखंड भारतावर वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीमध्ये राम माधव यांनी सांगितलं की, एक दिवस भारत, पाकिस्‍तान आणि बांगलादेश पुन्हा एकत्र येतील आणि अखंड भारत बनेन. भारत आणि पाकिस्‍तान 2025 पर्यंत एकत्र येईन आणि लाहोर हा भारताचा भाग असेन, असा दावा मार्च 2019 मध्ये संघाचे इंद्रेश कुमार यांनी देखील केला होता. शिवसेनाविरुद्ध मनसे 'सामना' शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी वांद्रे येथील प्रतिष्ठित कराची स्वीट्सच्या मालकाला दुकानाचे नाव बदलून भारतीय किंवा मराठी नाव देण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर मनसेनं देखील न्यायालयातील लढाई लढण्याचा इशारा दिला आहे. मात्र, या घटनेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही पक्षाची 'अधिकृत भूमिका' नसल्याचे स्पष्ट केले. राऊत म्हणाले, "कराची स्वीट्स आणि कराची बेकरी मुंबईत 60 वर्षांपासून आहेत. त्यांचा पाकिस्तानशी काही संबंध नाही. आता त्यांचे नाव बदलण्यात अर्थ नाही... ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही." कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी मनसेला विरोध दर्शवला. काय आहे प्रकरण? मुंबईत कराची स्वीट्स नावाने दुकानं सुरू असल्याचे निर्दशनास आल्यानंतर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'देशाचा पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानची राजधानी कराची या नावाने बहुचर्चित 'कराची स्वीट्स' या नावाचा आधार घेऊन मिठाईचे दुकान सुरू केले आहे. त्यामुळे भारतीयांच्या राष्ट्रवादाला ठेचू पोहोचून हा व्यवसाय केला जात आहे', असा आक्षेप मनसेचे नेते हाजी सैफ शेख यांनी घेतला आहे. हेही वाचा...कुटुंबासोबत किल्ल्यावर भ्रमंतीसाठी आलेली महिला कोसळली खोल दरीत, अन्.. या प्रकाराबद्दल हाजी शेख यांनी कराची व्यवस्थापनाला एक पत्र लिहून तात्काळ नाव हटवण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर एक कायदेशीर नोटीस सुद्धा हैदराबाद येथील कराची स्वीट्स व्यवस्थापकांना देण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये आजपर्यंत अनेकवेळा हिंसाचार झाला आहे. दहशतवाद्याची मोठा आधार म्हणून पाकिस्तानने तिथल्या हिंसाचाराला चिथावणी दिली आणि पाठिंबा दर्शवला. पाकिस्तान आपल्या सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सीमेवर गोळीबार केला आहे, आपले जवान यात शहीद झाले आहे, त्यामुळे अशा देशाच्या राजधानी असलेल्या कराची नावाने महाराष्ट्रात व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही मनसेनं दिला आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Maharashtra, MNS, Shiv sena

    पुढील बातम्या