मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

हिंमत असेल तर चला पुन्हा लोकांच्या कोर्टात, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना 'ओपन चॅलेंज'

हिंमत असेल तर चला पुन्हा लोकांच्या कोर्टात, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना 'ओपन चॅलेंज'

आम्ही सरकार खाली खेचणार नाही, पण तुमची हिंमत असेल तर चला पुन्हा लोकांच्या कोर्टात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आम्ही सरकार खाली खेचणार नाही, पण तुमची हिंमत असेल तर चला पुन्हा लोकांच्या कोर्टात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आम्ही सरकार खाली खेचणार नाही, पण तुमची हिंमत असेल तर चला पुन्हा लोकांच्या कोर्टात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 16 फेब्रुवारी : 'तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लढू. आम्ही एकटे असलो तरी तुम्हा तिघांना पुरुन उरू,' असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. आम्ही सरकार खाली खेचणार नाही, पण तुमची हिंमत असेल तर चला पुन्हा लोकांच्या कोर्टात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नवी मुंबईत झालेल्या भाजपच्या अधिवशेनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीतील इतर नेत्यांवर जोरदार टीका केली. 'सावरकरांवर टीका करणाऱ्यांना हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेस्तनाबूत करायचे. मात्र आता सावकरांचा अपमान रोज काँग्रेस करत आहे. हिंमत असेल तर शिदोरी मासिकावर बंदी घाला,' असं आव्हान देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:

- एल्गार परिषदे प्रकरणी एनआयएकडे चौकशी गेली याबद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन

- सत्य बाहेर येऊ नये म्हणून एसआयटी स्थापन करायची होती

- आपल्या भरवश्यावर आपण आपलं सरकार आणल्याशिवाय राहणार नाही

- चंद्रकांतदादांचा प्रवास थक्क करणारा आहे

- अतिशय सामान्य घरातील व्यक्ती पक्षाचा अध्यक्ष होतो हे फक्त भाजपातच होऊ शकतं

- आपल्या पक्षात कोणतीही गोष्ट कष्टाने मिळते

- भाजपात पद हे शोभेची गोष्ट नाही. भाजपात पद म्हणजे जबाबदारी

- आमच्याकरता सत्ता सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचं माध्यम आहे

- आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर कोणतंही युद्ध जिंकतो

- या पक्षानं आपली पाळंमुळे रोवली आहेत

- आपल्या प्रत्येकालाच अभिमान वाटला पाहिजे की आपण भाजपचे कार्यकर्ते आहोत

- कलम 370 हटवल्यामुळे 26 जानेवारीला जम्मू काश्मीरच्या प्रत्येक चौकात भारताचा तिरंगा लागला. या ऐतिहासिक प्रसंगाचे आपण साक्षीदार आहोत

- लोकांना विनाकारण भीती घालून दिली जात होती की 370 कलम रद्द केल्याने काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील, पण असं काहीही झाले नाही

- आता आयोध्येत प्रभू श्रीरामांचं मंदिर होणार आहे

- अनेक लोक आयोध्येत जाणार आहेत, उद्धव ठाकरेंना टोला

- तुम्हाला प्रभू श्रीराम योग्य मार्गदर्शन करेल आणि बाळासाहेबांच्या विचारांचं स्मरण प्रभू श्रीराम करुन देतील

- तिथे गेल्यावर तुमचं हिंदुत्वाचं रक्त सळसळेल

- सीएए - शेजारच्या देशात अल्पसंख्यकांना अनन्वित अत्याचार सहन करावे लागले. अशा पीडीतांची आपल्या देशात 30-40 वर्षं ना इधर ना उधरके अशी अवस्था झाली. अशा लोकांना नागरिकता दिली, तसा कायदा केला तर मोदीजींनी काय चूक केली ?

- काही जण सत्तेत येण्यासाठी काहीही करायला तयार आहेत

- समाजासमाजात भांडण लावायला तयार आहेत

- लोकांमधे रोज, खोटं बोल, रेटून बोल असं करत आहेत

- पवार म्हणाले भटक्या विमुक्तांच्या मनांत भीती आहे. हा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न आहे. सीएएचा परिणाम अशा कोणावरही नाही हे पवारांना माहिती आहे

- जेव्हा लोकांना कन्वहिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्युज करतात

- जाती आणि जमातींना आरक्षण देण्याचं काम मोदींनी केलं आहे

- येत्या काळात भाजप कार्यकर्त्यांनी बचावात्मक धोरण घेऊ नये

- कार्यकर्त्यांनी ऐकून घ्यायचं नाही, सुनवायचं

- जनादेशाचा विश्वासघात झाला

- बाळासाहेबांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री बनवेल असं तुम्ही वचन दिले होतं का उद्धवजी ?

- विश्वासघात झाला म्हणून रडण्याचे नाही तर लढण्याचे दिवस आहेत

- सत्ता पक्षातून विरोधी पक्षात येण्यात काही वेळा वेळ लागतो

- आपला डीएनए विरोधी पक्षाचा आहे

- विरोधी पक्षाची भूमिका दोर कापून करावी लागते

- सरकारशी थेट मुकाबला केल्याशिवाय विरोधक म्हणून काम करता येत नाही

- या सरकारला जेरीस आणल्याशिवाय राहणार नाही

First published: