मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

इन्कम टॅक्सच्या कारवाईवरून फडणवीसांचा अजित पवारांना टोला, म्हणाले...

इन्कम टॅक्सच्या कारवाईवरून फडणवीसांचा अजित पवारांना टोला, म्हणाले...

'पवार कुटुंबामध्ये इतर अनेक लोक आहेत, ते त्यांचे व्यवसाय करत आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई झालेली नाही'

'पवार कुटुंबामध्ये इतर अनेक लोक आहेत, ते त्यांचे व्यवसाय करत आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई झालेली नाही'

'पवार कुटुंबामध्ये इतर अनेक लोक आहेत, ते त्यांचे व्यवसाय करत आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई झालेली नाही'

नागपूर, 09 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांचा मुलगा आणि बहिणीवर इन्कम टॅक्स विभागाने (Income Tax Department) कारवाई केल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 'पवार कुटुंबामध्ये इतर अनेक लोक आहेत, ते त्यांचे व्यवसाय करत आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई झालेली नाही. त्यामुळे आयकर विभागाच्या कारवाई पवार कुटुंबीयांच्या विरोधात आहे असं म्हणणं चुकीचं आहे' असा टोला फडणवीसांनी लगावला. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या नातेवाईकांवर झालेल्या कारवाईवर भाष्य केलं आहे. 'आयकर विभागाने ज्या धाडी टाकले आहेत. त्या दोन प्रकारच्या आहेत. पहिल्या दिवशी झालेल्या कारवाईबद्दल आयकर विभागाने 1,050 कोटी रुपयांच्या दलालीचे पुरावे सापडल्याचे सांगितले आहे. हे अत्यंत गंभीर आहे. माध्यमांनाही त्याच गांभीर्य अजून कळलेलं नाही. ही 1050 कोटींची दलाली बदल्यांसाठीची आहे, टेंडर साठीची आहे. असे देशात पहिल्यांदाच होत आहे' असंही फडणवीस म्हणाले. सातवीच्या विद्यार्थीनीवर शाळेतच बलात्कार; गट शिक्षणाधिकाऱ्याच्या चालकाचे कृत्य काल ज्या पाच साखर कारखान्यांवर धाडी टाकण्यात आल्या. त्या कारखान्याच्या खरेदीसाठी राबवण्यात आलेली प्रक्रिया चूक असल्यामुळे ही कारवाई झाली. साखर कारखाना खरेदी करताना तुम्ही तो लाचेच्या किंवा काळ्या पैशाने त्याबद्दल फक्त टॅक्स भरून तो पांढरा पैसा आहे असं भासवून खरेदी करू शकत नाही. कारखाना खरेदी करताना तो योग्य पैशानेच खरेदी करावा लागतो. मात्र, या पाचही प्रकरणात तसं झालं नव्हतं. त्या प्रकारच्या तक्रारी होत्या आणि त्यानंतरच आयकर विभागाने कारवाई केली आहे, असं म्हणत फडणवीस यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. माजी IAS अधिकारी होणार जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांचे सल्लागार? 'पवार कुटुंबामध्ये इतर अनेक लोक आहेत, ते त्यांचे व्यवसाय करत आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई झालेली नाही. त्यामुळे आयकर विभागाच्या कारवाई पवार कुटुंबीयांच्या विरोधात आहे असं म्हणणं चुकीचं आहे, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. 'राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाचा जवळचा माणूस होता पार्टीत' 'ड्रग ही समाजाला लागलेली कीड आहे. यासाठी कोणती एजन्सी काम करत असेल तर तिच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. हा कोणत्या पक्षाचा प्रश्न नाही, हा समाजाचा आणि तरुणाईचा प्रश्न आहे. याचे राजकारण केले जात आहे. ज्यांना सोडलं त्यामध्ये  NCP च्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा एक जवळचा माणूस  होता. त्याचं नाव आम्ही घेत नाही कारण की, तो क्लीन होता. तो क्लीन असल्यामुळे त्याचं नाव घेऊन त्याला बदनाम करणे अयोग्य आहे' असं फडणवीस म्हणाले.
First published:

पुढील बातम्या