काही पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत, फडणवीसांची राष्ट्रवादीवर टीका

काही पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत, फडणवीसांची राष्ट्रवादीवर टीका

'महाराष्ट्रात कृषी विधेयक येऊन इतके दिवस झाले कुठलही आंदोलन महाराष्ट्रात झाले नाही आणि आता जे लोकं या मोर्चाच्या निमित्ताने मंचावर जात आहेत'

  • Share this:

कृषी विधेयक, केंद्र सरकार नागपूर, 25 जानेवारी : कृषी विधेयक (Farmer act) रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर (farmers march in mumbai) हजारो शेतकरी जमले आहे. परंतु, 'काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगबाजी करत आहेत, शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, शेतकऱ्यांना चुकीच्या गोष्टी सांगण्यात येत आहेत,' अशी टीका भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली आहे.

'महाराष्ट्रात कृषी विधेयक येऊन इतके दिवस झाले कुठलही आंदोलन महाराष्ट्रात झाले नाही आणि आता जे लोकं या मोर्चाच्या निमित्ताने मंचावर जात आहेत. त्यांना माझा सवाल आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या 2019 च्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की,  बाजारसमित्या रद्द करा आणि आम्ही सत्तेत आलो तर बाजारसमित्या रद्द करू त्यांनी आता उत्तर दिलं पाहिजे, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थितीत केला आहे.

मास्क घालण्यास नकार देणाऱ्या ‘या’ देशांच्या राष्ट्रपतींना झाला कोरोना!

'2006 साली कंत्राटी शेतीचा कायदा त्यांनी का मंजूर केला याचं उत्तर दिलं पाहिजे. 2020 पर्यंत तो कायदा सुरू आहे. यांना महाराष्ट्रातला कायदा चालतो मग केंद्राचा का नाही, ही ढोंगबाजी का? महाराष्ट्रात 29 थेट खरेदीचे लायसन्स काँग्रेस राष्ट्रवादीने दिले, चिखली बाजार समितीमध्ये  थेट खरेदीचे अधिकार कार्पोरेटला दिले, केंद्र सरकार तर ते देखील देत नाहीय, ही केवळ ढोंगबाजी करत आहे' अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

'शेतकऱ्यांचा या मोर्च्याला काहीही पाठिंबा नाही, उलट शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने तर या कृषी कायद्यांचे स्वागत केले आहे, असंही फडणवीस म्हणाले.

'भंडाऱ्यामध्ये भाजपचा वेगवेगळ्या मागण्याकरिता मोर्चा आहे. सगळ्यात पहिले धन खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. जे पैसे शेकऱ्याला मिळायला पाहिजे होते ये काही धनदांडग्यांनी मिळून लाटून नेलेले आहे आणि अक्षरश: त्या ठिकाणी बोगस माल हा FCI ला देण्यात येत आहे. अतिशय मोठा धान घोटाळा हा त्याठिकाणी सत्तपक्षाच्या ठिकाणी मिळून केलेला आहे, त्यांच्या चेल्याचपट्याने मिळून केला आहे त्याच्याविरुद्ध हा मोर्चा आहे' असंही फडणवीस म्हणाले.

धनंजय मुंडे प्रकरणावर अखेर पंकजांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाल्या....

त्यासोबत ज्या प्रकारे वीजबिलाच्या संदर्भात या सरकारने जनतेशी बेईमानी केली आहे. त्या बेईमानीच्या विरोधात हा मोर्चा आहे. वीजबिल याठिकाणी  इतक्या मोठ्या प्रमाणात दिली आहे आणि आता आम्ही विजेचे कनेक्शन कापायची सुरुवात केलेली आहे,

भंडाराच्या शासकीय रुग्णालयामध्ये अत्यंत भयानक घटना घडली. या घटनेत 10 बालकांचा जीव गेला आहे. पण सरकार असंवेदनशील आहे, अशा विविध मागण्यांकरिता  हा मोर्चा  त्याठिकाणी आहे. आम्ही सरकारला स्वस्त बसू देणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

Published by: sachin Salve
First published: January 25, 2021, 12:25 PM IST

ताज्या बातम्या