हे लोकनियुक्त सरकार नाही, बेईमानानं आलेलं सरकार; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

हे लोकनियुक्त सरकार नाही, बेईमानानं आलेलं सरकार; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

आमचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर आहेत. कोणीही घरी बसलेले नाही आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

  • Share this:

मुंबई, 8 ऑक्टोबर: भाजप नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर कोरोना काळातील भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, मराठा आरक्षण, कृषी कायदे अशा विविध मुद्द्यांवरुन सडकून टीका केली. महाराष्ट्र प्रदेश भाजपची कार्यकारिणीची बैठक गुरूवारी पार पडली.

सरकारमधील मंत्र्यांना झोप कशी लागते? एकट्या महाराष्ट्रात 15 लाख जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 39 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. हे तर अधिकृत आकडे आहेत. अनधिकृत आकडे किती असतील. महाराष्ट्रात आकड्यात मृत्युंच्या 15 हजारांचा फरक आहे, असा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार केला.

आमचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर आहेत. कोणीही घरी बसलेले नाही आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला. उद्धवजी तुमच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती, इतके बदललात ? बाळासाहेब ठाकरे यांचे तुम्ही सुपुत्र आहात, देव-देश-धर्माची लढाई तुम्ही विसरले आहात? हे लोकनियुक्त सरकार नाही, बेईमानानं आलेलं सरकार आहे, अशी जहरी टीका फडणवीस यांनी केली.

हेही वाचा...जेपी नड्डा म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं, पण...

राज्यात बदल्यांचा धंदा सुरू आहे. राज्यात कोरोनाचा धंदा सुरु आहे. कोविडचा बाजार मांडला आहे, भ्रष्टाचार सुरु आहे. म्हसन्या नावाच्या प्राण्याशी तुलना करायची का? असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला. कुठे चाललाय महाराष्ट्र माझा? राज्यकर्त्यांनी उत्तर द्यावं, असं देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलं. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तर महाराष्ट्र म्हणजे 12 कोटी जनता आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे...

-कोरोनाच्या परिस्थतीला सामोरं जात भाजप काम करते

-आम्ही रस्त्यात, शेतात जाऊन काम करणारे लोकं आहोत

-वेळप्रसंगी संघर्ष करुन काम करणारा भाजप पक्ष आहे

-आमचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर आहेत, कोणीही घरी बसलेले नाहीये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

-मंत्र्यांना झोप कशी लागते ? १५ लाख जणांना कोरोनाचा संसर्ग झाला, ३९ हजार जण मृत्यू पावले

-हे तर अधिकृत आकडा आहे, अनधिकृत आकडे किती असतील

-महाराष्ट्रात आकड्यात मृत्युंच्या १५ हजारांचा फरक आहे

-राज्यात बदल्यांचा धंदा आहे

-राज्यात कोरोनाचा धंदा सुरु आहे

-म्हसन्या नावाच्या प्राण्याशी तुलना करायची का ?

--कोव्हीडचा बाजार मांडला आहे, भ्रष्टाचार सुरु आहे

-कुठे चाललाय महाराष्ट्र माझा ? राज्यकर्त्यांनी उत्तर द्यावं

--तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, महाराष्ट्र म्हणजे १२ कोटी जनता

-कशाच्या बदनामीची गोष्ट करताय ? रोज महिलांवर अत्याचार होतायंत

-कोव्हीड सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार होतायंत यानं महाराष्ट्राची बदनामी होतेय

-कोव्हीड सेंटरमध्ये रोज बलात्काराच्या घटना

-हाथरसच्या गोष्टीचा निषेध आहे, केलाच पाहिजे

-राज्य, जात, समाज, राजकीय व्यवस्था पाहून रस्त्यावर उतरत असाल तर मग तुम्ही किती बेगडी आहात, राजस्थानच्या दलित भगिनीबद्दल का आंदोलन नाही ?

-फेब्रुवारी २०२० मध्ये ७ ठिकाणी राज्यात महिलांवर अत्याचार झाला, तिथे केलं का आंदोलन ?

-कुठे महाराष्ट्र सुरक्षित आहे ?

-गृहमंत्री जरा आपलं पाहा ना ?

-महाराष्ट्राच्या गोष्टींवर जरा संवेदना व्यक्त करा

-राज्यातील एक मंत्री हाथरसच्या ठिकाणी गेले, ते हिंगणघाटला तुमच्या बाजूला एका महिलेला जाळून टाकलं तेव्हा तुम्ही ना गेलात

-महिला अत्याचारांच्या संदर्भात राजकारण झालं नाही पाहिजे.

-शरद पवारांनी लाक्षणिक उपोषण खासदारांच्या निलंबनाबद्दल केलं कृषी कायद्याबद्दल नाही

-मॅडमचा दबाव म्हणून उद्धवजी तयार झाले आणि कृषी विधेयकांबद्दल विरोध केला

-जर लिहिणारे पवार शेतक-यांचे कैवारी असतील तर त्यांची अंमलबजावणी करणारे मोदी शेतक-यांचे कैवारीच आहेत

-शेतक-यांच्या बांधावर कृषी कायदा समजावून सांगणार

-सगळ्या आघाड्यांवर सरकार अपयशी झाल्याने मूळ विषयांवर भरकवटण्यासाठी वेगवेगळे विषय काढले जातायंत

-कोरोनाच्या काळात आम्ही राजकारण करायचं नाही असं ठरवलं होतं पण याच काळात भ्रष्टाचार होत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल

- सरकार मंदिरं उघडत नाहीये दारुच्या दुकानांची वेळ वाढवली आहे. मंदिरं नाही मदिरा सरकार देतंय

-उद्धवजी तुमच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती, इतके बदललात ?

-बाळासाहेब ठाकरे यांचे तुम्ही सुपुत्र आहात, देव देश धर्माची लढाई तुम्ही विसरले आहात ?

-हे लोकनियुक्त सरकार नाही बेईमानाने आलेलं सरकार आहे

-रस्त्यावर उतरुन सरकार वठणीवर आणू

-कृषी कायद्यात जे पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेल्या मागण्याच आहेत

-कृषी आणि कामगार कायदे जनहिताचेच

-दोन्ही कायद्यांबद्दल आम्ही मोदींचं अभिनंदन केलं

-राज्यात महिला अत्याचार वाढले आहेत, १२ तारखेला राज्यस्तरीय ‘उद्धवा जागे व्हा’ असं आंदोलन करणार. मुंबईत शिवाजी पार्क ते चैत्यभूमी मोर्चा काढणार

-मराठा आरक्षणाबाबत १ महिना झाला तरी केस सुप्रीम कोर्टात मेन्शन नाहीये

-उद्धव ठाकरेना मी हेच सांगू इच्छितो की सत्ता वाचवताना काय चाललंय याच्याकडे लक्ष आहे का? 26 हजार कोटींचा घोटाळा झाला असताना क्लीन चीट कसे काय देताय ? फक्त खुर्ची टिकवण्यासाठी हे चालू आहे

-एमपीएससी परीक्षा - सरकार काय झोपा काढतंय का ? सरकारने इतक्या दिवस समन्वय का केला नाहीये ?

-प्रकाश आंबेडकरांना मी आवाहना करेल की त्यांनी दोन मोठ्या घराण्याबद्दल अशा भाषेत अनादर व्यक्त करु नये

-रिपब्लिक - मुंबई पोलिस आयुक्तांनी कारवाई करावी, रोज उठून धमक्या देऊ नयेत

-खडसे - आमच्या बैठकीत कार्यकारिणीचे सदस्य व्हीसीद्वारे होते. खडसे समजदार नेते आहेत, आमचे ते पालक आहेत, आम्ही त्यांचे पाल्य आहोत.

-एकनाथ खडसे पण एक माणूस आहेत, ते त्यांच्या भावना व्यक्त करतात, ते आमचे पालक आहेत त्यांनी दोन थोबाडीत मारा पण दांडक्यासमोर का बोलता?

Published by: Sandip Parolekar
First published: October 8, 2020, 7:13 PM IST

ताज्या बातम्या