Home /News /maharashtra /

शरद पवारांचा दिल्लीतून भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला पलटवार

शरद पवारांचा दिल्लीतून भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला पलटवार

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

शरद पवारांच्या या भूमिकेवर पलटवार करत भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadanvis) यांनी नवा प्रश्न उपस्थित केला आहे.

  तुषार कोहळे, नागपूर, 21 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषद घेत गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत भाष्य केलं आहे. यावेळी पवार यांनी भाजपवरही निशाणा साधला. शरद पवारांच्या या भूमिकेवर पलटवार करत भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadanvis) यांनी नवा प्रश्न उपस्थित केला आहे. 'शरद पवार हे महाआघाडी सरकारचे निर्माते आहे. त्यामुळे त्यांचे सरकार कसेही वागले तरी पवारांना सरकारची बाजू घ्यावी लागते. शरद पवारांनी सांगितले की हा प्रकरणाची चौकशी जुलिओ रिबेरो साहेबांनी करावी. मग ते परमवीर सिंह यांची चौकशी करणार की संपूर्ण घटनेची चौकशी करणार? तसंच ते वर्तमान गृहमंत्र्यांचा तपास करणार का?' असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपुरात बोलताना नक्की काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? जाणून घ्या ठळक मुद्दे : - परमवीर सिंह यांनी आपल्या पत्रात पवार साहेबांचा उल्लेख केला.. त्यात चॅटचा उल्लेख आहे..तो ही ते सीपी पदावर असतानाचं ते चॅट आहे...त्यामुळे तो एकप्रकारे महत्वाचा पुरावा आहे - गृहखातं अनिल देखमुख चालवत की अनिल परब चालवतात? - अँटिलिया प्रकरणात एपीआय वाझे अटकेनंतर व परमवीर यांनी पत्रातून जो खुलासा केला तो धक्कादायक आहे. असे खुलासे करणारे परमवीर सिंह पाहिले नाही...सुबोध जैसवाल यांनी देखील बदल्यांसंदर्भात असाच अहवाल दिला होता - सुबोध जैसवाल हे महासंचाक पद सोडून ते केंद्राच्या सेवेत ते निघून गेले, याचं कारण त्यांनी बदल्यांसंदर्भात जे प्रश्न उपस्थित केले त्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही त्यामुळे ते केंद्रीय सेवेत गेले. - रश्मी शुक्ला यांनी देखील डिजी असताना फोन कॉल ट्रेस करून जो रिपोर्ट सादर केला होता त्यावर पण कारवाई झाली नाही त्या देखील केंद्रीय सेवेत गेल्या. - संजय राऊत यांनी आज पहिल्यांदा आत्मचिंतन केलं

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Akshay Shitole
  First published:

  Tags: Devendra Fadnavis, Sharad pawar

  पुढील बातम्या