'त्यांना हिशेब येत नाही...', रोहित पवारांवर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

'त्यांना हिशेब येत नाही...', रोहित पवारांवर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

रोहित पवारांच्या टीकेला भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Share this:

सातारा, 28 ऑगस्ट : 'सगळ्या गोष्टीचं क्रेडिट घेणारं केंद्र सरकार स्वतःच्या अंगावर आलं की राज्यांना 'क्रेडिट' घ्यायला सांगत आहे. हे फक्त राज्याच्या हक्काच्या GST च्या बाबतीतच नाही तर इतरही अनेक गोष्टीत पहायला मिळतं. असं कसं चालेल?,' असं ट्वीट करत राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. रोहित पवारांच्या या टीकेला भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

'राज्याचे कुठलेही पैसे केंद्राकडे अडकून नाहीत. रोहित पवार यांना हिशेब समजत नाही,' असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. फडणवीसांच्या या प्रत्युत्तरानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा वाद रंगण्याची शक्यता आहे.

भाजप कुठल्याही विषयावर राजकारण करू शकते, रोहित पवारांची खरपूस टीका

'भाजप कुठल्याही विषयावर राजकारण करु शकते असे माझे मत आहे. उद्याचे आंदोलनही राजकारण डोक्यात ठेवूनच ते आंदोलन करत असतील असं मला वाटते. खरंच त्यांना महाराष्ट्रातील जनतेचा कळवळा असता तर भाजपचे नेते जीएसटीच्या प्रश्नावर केंद्र शासनाशी बोलले असते. भाजपने घाईगडबडीत एलबीटी रद्द केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे 26 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. ते पैसे केंद्राकडून मिळाले असते तर महाराष्ट्रातील जनतेवर जनतेच्या आरोग्यावर तो पैसा खर्च केला असता. पण त्यावर केंद्राची किंबहुना केंद्रातील मंत्र्यांसोबत बोलण्याची भीती त्यांना वाटते. त्यामुळे ते बघत नसावेत,' असा हल्लाबोल रोहित पवार यांनी नगरमध्ये बोलताना केला आहे.

परीक्षेवरूनही लगावला टोला

'आमची परीक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती व राहील. पण आशिष शेलारजी बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं. आता त्यासाठी किमान आपल्या ट्वीट खालील रिप्लाय तरी वाचाल,' असा चिमटा काढत रोहित पवारांनी भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांना फटकारलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 28, 2020, 9:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading