Home /News /maharashtra /

फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार; म्हणाले, 'प्रत्येक बापाला वाटतं...'

फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार; म्हणाले, 'प्रत्येक बापाला वाटतं...'

शरद पवार यांनी फडणवीसांच्या कोकण दौऱ्यावर शेरेबाजी करत टीका केली होती. या टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलं आहे.

    मुंबई, 11 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणात झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. त्यानंतर लगेचच भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील कोकणात दाखल झाले. यावेळी शरद पवार यांनी फडणवीसांच्या कोकण दौऱ्यावर शेरेबाजी करत टीका केली होती. या टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलं आहे. 'शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. आज माझे वडील हयात असते तर तेही शरद पवार यांच्याच वयाचे असते. प्रत्येक बापाला वाटतं की मुलाला माझ्यापेक्षा कमीच कळतं. मुलगा कितीही पुढे गेला तरीही बापाची तिच भावना असते,' असा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. याबाबत 'TV9 मराठी'ने वृत्त दिलं आहे. शरद पवार नक्की काय म्हणाले होते? 'देवेंद्र फडणवीस कोकण दौऱ्यावर येत आहेत हे चांगलं आहे, सर्वाना कळलं पाहिजे किती नुकसान झालं आहे ते. प्रत्येकजण वेगवेगळ्या भागातून येतो. मी दुष्काळी भागातून येतो, ते नागपुरातून येतील. समुद्राचा आणि नागपूरचा तसा काही संबंध नाही. पण त्यामुळे सर्वांच्या ज्ञानात भर पडेल,' अशा शब्दांत शरद पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला होता. देवेंद्र फडणवीस यांचा कोकण दौरा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची ते पाहणी करत आहेत. आज सकाळी त्यांनी मागव आणि रेवदंडा येथे भेट दिली. संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Sharad pawar

    पुढील बातम्या