घोटाळ्यांच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस भडकले, विरोधकांवर घणाघात

घोटाळ्यांच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस भडकले, विरोधकांवर घणाघात

राजू शेट्टी यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस सरकारचे घोटाळे बाहेर काढू, असा इशारा दिला आहे.

  • Share this:

वीरेंद्रसिंह उत्पात, सोलापूर, 12 जानेवारी : राज्यात सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर फडणवीस सरकारवर चौफेर आरोप होत आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस सरकारचे घोटाळे बाहेर काढू, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करणाऱ्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. 'आम्ही कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. जनतेला आमचा कारभार माहीत आहे. कोणाला काहीही आरोप करायचे असतील तर करावेत. आमच्या काळात कोणाचीही अडवणूक केली नाही. कोणतेही प्रकल्प अडवले नाहीत. कसलाही भ्रष्टाचार केला नाही. कोणाला काय चौकशी करायचे ते करा,' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या नेत्यांवर पलटवार केला आहे.

फडणवीसांचा डायलॉग वापरत नारायण राणेंचा ठाकरे पिता-पुत्रावर शाब्दिक हल्ला

देवेंद्र फडणवीस हे अकलू मध्ये दिवंगत शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्याच्या आनावरणासाठी उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहित पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.

बॉक्स ऑफिसवर 'तानाजी'चा धुमाकूळ, आता उदयनराजेंना अजय देवगणकडून 'ही' अपेक्षा

यावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांनीही राष्ट्रवादीवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. 'राष्ट्रवादी काँग्रेसनं आमच्या सदस्यावर काय कारवाई केली, याबाबत आम्हाला अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र राष्ट्रवादीला कारवाई करायचीच असेल तर आधी भाजपसोबत जाऊन रात्रीच्या अंधारात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांच्यावर त्यांनी कारवाई करावी आणि नंतर राष्ट्रवादीने मोहिते पाटील गटाच्या सदस्यांवर कारवाई करावी,' असे खुले आव्हान विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीला दिलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 12, 2020, 2:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading