मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पृथ्वीराज चव्हाणांच्या धक्कादायक खुलाशानंतर रान पेटलं, देवेंद्र फडणवीसांनीही दिली प्रतिक्रिया

पृथ्वीराज चव्हाणांच्या धक्कादायक खुलाशानंतर रान पेटलं, देवेंद्र फडणवीसांनीही दिली प्रतिक्रिया

भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 20 जानेवारी : 'शिवसेनेनं 2014 मध्येही काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी प्रस्ताव दिला होता,' असला धक्कादायक खुलासा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकताच केला. त्यानंतर भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'शिवसेनेनं जर 2014 मध्ये काँग्रेसला असा प्रस्ताव दिला असेल तर ही खूप गंभीर बाब आहे. याबाबत शिवसेनेच्या नेत्यांनी खुलासा करावा,' अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून भाजप शिवसेनेविरोधात आणखीनच आक्रमक होण्याची शक्यता आहे. नक्की काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण? 'वर्षानुवर्ष एकमेकांविरोधात लढणारी शिवसेना आणि काँग्रेस आता अचानक एकत्री कशी आली?', असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना चव्हाण म्हणाले की, '2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी अल्पमतात सरकार स्थापन केलं होतं. तेव्हा सुरुवातीच्या काळात शिवसेना विरोधी पक्षात बसली होती. त्यावेळी शिवसेनेकडून आम्हाला सत्तास्थापनेसाठी प्रस्ताव आला होता. मात्र आम्ही या प्रस्ताव फेटाळून लावला.' मनसेच्या महाअधिवेशानाआधी मोठा धमाका होणार? नेत्याने घातली शिवसैनिकांना साद 2014 मध्ये काय होतं संख्याबळ? विधानसभेच्या एकूण जागा- 288 भाजप- 122 शिवसेना- 63 काँग्रेस- 42 राष्ट्रवादी- 41 भाजपच्या टीकेनंतर शिवसेनेचा खुलासा 2014 मध्ये शिवसेनेनं काँग्रेसला प्रस्तव पाठवल्याच्या चर्चेनंतर शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'अशा प्रकारचा प्रस्ताव दिल्याची माहिती नाही. मी या चर्चेचा भाग नव्हतो,' असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.
First published:

Tags: Devendra fadanavis, Prithiviraj chavan

पुढील बातम्या