उद्धव ठाकरेंवर सलग दुसरा मोठा घणाघात, अमृता यांच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही केला हल्लाबोल

उद्धव ठाकरेंवर सलग दुसरा मोठा घणाघात, अमृता यांच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही केला हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 23 डिसेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपकडून पुन्हा एकदा घणाघाती टीका करण्यात आली आहे. भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर शेतकरी प्रश्नावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'आधीचे उद्धव ठाकरे आता राहिले नाहीत,' अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

'अवकाळी पावसामुळे नुकसान झालं, पण सरकारने एखा नव्या पैशाची मदत जाहीर केली नाही. विश्वासघाताने तयार झालेल्या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. अधिवेशनात सरकारने औपचारिकता पार पाडली. चर्चा केली नाही, तसंच कोणतीही उत्तरं दिली नाहीत. मंत्र्यांनी 3-3 मिनिटांत उत्तर देऊन वेळ मारून नेली,' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

'राज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. राज्याची अर्थव्यवस्था 15. 8 टक्के आहे. सकल उत्पन्नात राज्याची अवस्था चांगली आहे. सकल उत्पनाच्या 15.8 टक्के इतके कर्ज आहे, 26 टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकतो,' असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे यांनाना उद्धव ठाकरेंनी असा शब्द दिला होता का की, दोन्ही काँग्रेसच्या जीवावर सत्ता स्थापन करणार? असा बोचरा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

अमृता फडणवीसांनीही केली होती उद्धव ठाकरेंवर टीका

अमृता फडणवीस या गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर कमालीच्या सक्रीय झाल्या आहेत. भाजपची सत्ता गेल्यानंतर त्यांची ट्विटरवरची सक्रियता जास्तच वाढली असून त्यांनी आता थेट शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावरच हल्लाबोल करायला सुरुवात केलीय. देवेंद्र फडणवीस यांनी 14 डिसेंबरला सावरकरांच्या मुद्यावरून राहुल गांधींवर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधलाय. या आधीही अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती.

कोरेगाव भीमा हिंसाचार: मिलिंद एकबोटे, संभाजी भिडेंसह 163 जणांना जिल्हाबंदी

आत्तापर्यंत अमृता फडणवीस या फक्त सामाजिक बाबींवरच ट्वीट करत असत. आता मात्र त्या थेटपणे राजकीय विषयांवर टीका करू लागल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही असं राहूल गांधी यांनी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात म्हटलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. फक्त गांधी आडनाव असून चालत नाही. त्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

त्यावर आता आठ दिवसांनी अमृता फडणवीस यांनी ट्विटरूवरून प्रतिक्रिया देत हल्लाबोल केलाय. त्या म्हणाल्या, खरंय देवेंद्रजी, फक्त 'ठाकरे' आडनाव असून सुद्धा कोणी 'ठाकरे' होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रमाणिकपणे काम करावं लागतं अशी थेट टीकाच त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 23, 2019, 11:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading