आम्हाला कोणतीही घाई नाही, आम्ही सरकार पडणार नाही, फडणवीस यांचं मोठ वक्तव्य

आम्हाला कोणतीही घाई नाही, आम्ही सरकार पडणार नाही, फडणवीस यांचं मोठ वक्तव्य

देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 9 जुलै: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या दौऱ्यावर असलेले विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. आपापसात विरोधाने भरलेले सरकार लोकांच्या हिताचे नाही, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.

आम्हाला कोणतीही घाई नाही. मात्र, आम्ही डोळे झाकूनही बसणार नाही. आम्ही सरकार पडणारही नाही, असं मोठ वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

हेही वाचा....'पार्टी विथ डिफरन्स' अशी ओळख असलेल्या भाजपचा बेशिस्तीचे दर्शन घडवणारा VIDEO

देवेंद्र फडणवीस गुरूवारी सायंकाळी औरंगाबाद शहराला पोहोचले. सुरवातीला त्यांनी घाटी रुग्णालयाच्या डीन आणि प्रशासनासोबत चर्चा केली. कोरोनाबाधितांच्या वॉर्डला भेट दिली. कॊरोनाबाधित रुग्णांना काय सुविधा दिल्या जातात, या बद्दल माहिती जाणून घेतल . यादरम्यान फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाला सुद्धा त्यांनी भेट दिली. नंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, औरंगाबादेत 24 तासांत कोरोना टेस्टिंगचा रिझल्ट येत आहे. ही चांगली बाब आहे. मात्र, खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांना जास्त पैसे मोजावे लागतात. त्यासाठी आता नव्या जीआरची गरज आहे. सरकारी योजनेचा फायदा फक्त क्रिटिकल रुग्णांनाच मिळत आहे. तो सगळ्यांना मिळायला हवा, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. औरंगाबादमध्ये कोरोना बाबतीत टेस्ट वाढवण्याची गरज आहे. घाटी रुग्णालयात स्टाफ सहित औषधींची कमतरता असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सरकारच्या निदर्शनास आणलं.

औरंगाबादमध्ये लॉकडाऊनमध्ये अग्रेसिव्ही टेस्टिंगची गरज आहे. औरंगाबादकारांनी कर्फ्युला चांगला प्रतिसाद द्यावा, असं आवाहन फडणवीस यांनी यावेळी केलं.

हेही वाचा...अँटी व्हायरल औषधी लवकरच राज्यात येणार; आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांकडे सरकारच लक्षच नाही...

शेतकऱ्यांना बांधावर बियाणे आणि खत देणार, अशी राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं फक्त घोषणा केली. मात्र, शेतकऱ्यांना दिलेलं बियाणे उगवलं नाही. राज्यात युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. मूळात सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्षच नाही, असा आरोपही फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 9, 2020, 7:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading