शिवेंद्रराजेंना धक्का देण्यासाठी पवारांची खेळी, राष्ट्रवादीत होणार इनकमिंग

शिवेंद्रराजेंना धक्का देण्यासाठी पवारांची खेळी, राष्ट्रवादीत होणार इनकमिंग

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिवेंद्रराजे भोसले यांना धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीने मोठी खेळी खेळली आहे.

  • Share this:

किरण मोहिते, 19 सप्टेंबर : राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिवेंद्रराजे भोसले यांना धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीने मोठी खेळी खेळली आहे. विधानसभा निवडणुकीत दोन वेळा भाजपचे उमेदवार राहिलेल्या भाजपच्या दीपक पवार हे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 22 सप्टेंबरला साताऱ्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत दीपक पवार राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी माहिती आहे. 'शिवेंद्रराजे हटाव'चा नारा देत दीपक पवार राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजे यांच्याविरोधात दीपक पवार यांनी अटीतटीची लढत दिली होती. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. तर दुसरीकडे, शिवेंद्रराजे भोसले यांच्या अडचणी वाढणार आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपने साताऱ्याचे एकेक मोहरे आपल्या तंबूत घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पडून इथे पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकणार असल्याची चिन्हं आहेत. याआधीच्या दोन निवडणुकांमध्ये सातारा जिल्ह्यातली एकही जागा भाजपला मिळाली नव्हती. आता मात्र समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे या दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रामराजे नाईक निंबाळकर हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरेंनीही भाजपचा रस्ता धरला. या सगळ्या नेत्यांचा भाजप प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच महागात पडू शकतो.राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात यावेळी 4 आमदार निवडून आणण्याचा निर्धार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

शिवेंद्रराजे भोसलेंचा भाजप प्रवेश

सातारा जावळी मतदारसंघात राष्ट्रवादीतून भाजपत आलेले शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळे इच्छुक असलेले भाजपचे नेते दीपक पवार यांचा पत्ता कट झाला. त्यांना भाजपने पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचं अध्यक्षपद देऊन राज्यमंत्रिपदाचा दर्जा देऊ केला होता. पण नाराज झालेल्या दीपक पवार यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

VIDEO: मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीसांचा पवारांवर हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 03:11 PM IST

ताज्या बातम्या