मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'खिसे गरम' करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देईल, चित्रा वाघ यांचा यशोमतींना टोला

'खिसे गरम' करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देईल, चित्रा वाघ यांचा यशोमतींना टोला

'गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री यशोमती ठाकूर @AdvYashomatiINC यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला.

'गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री यशोमती ठाकूर @AdvYashomatiINC यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला.

'गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री यशोमती ठाकूर @AdvYashomatiINC यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला.

मुंबई, 16 ऑक्टोबर: काँग्रेसच्या (Maharashtra congress) आक्रमक नेत्या आणि महिला-बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना कोर्टानं दोषी ठरवत 3 महिने तुरुंगवास आणि 15000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. यावरुन आता भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा...नागपुरात मायलेकीचा मृतदेह आढळला, व्यक्त केला जातोय वेगळाच संशय

'गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या तत्कालीन आमदार आणि विद्यमान मंत्री यशोमती ठाकूर @AdvYashomatiINC यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. खरं तर मागणी करायच्या आधीच त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता, पण 'खिसे गरम' करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल?', अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी यशोमती यांना सणसणीत टोला लगावला आहे.

दरम्यान, यशोमती ठाकूर यांची जामिनावर सुटका झाली आहे. पण, भाजपनं यावर यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

कोर्टाच्या निकालानंतर काय म्हणाल्या यशोमती ठाकूर?

'न्यायालयीन प्रक्रियेचा मी सदैव आदर केला आहे. मी स्वत: वकील आहे. त्यामुळे या प्रकरणावर मी फार भाष्य करणं योग्य नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. या क्षणी मी इतकंच सांगू शकते की शेवटी विजय सत्याचा होईल', असं यशोमती ठाकूर निकालानंतर म्हणाल्या.

भाजपने केलेल्या राजीनामा देण्याच्या मागणीबाबत त्या म्हणाल्या, 'एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल. त्यांना इतकंच काम आहे. भाजप सोबत माझी वैचारिक लढाई आहे आणि मला राजकीय आयुष्यातून संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, पण मी माघार घेणार नाही. भाजपशी माझी लढाई सुरूच राहील.'

काय आहे प्रकरण?

आठ वर्षांपूर्वी म्हणजेच 24 मार्च 2012 रोजी अमरावतीच्या प्रसिद्ध अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाची हुज्जत घातल्या प्रकरणी यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलीस कॉन्सेटबलवर हात उगारल्याचाही आरोप होता. त्यावर गुरुवारी जिल्हा न्यायालायात सुनावणी पूर्ण झाली. न्या. उर्मिला जोशी यांनी यशोमती ठाकूर यांना प्रकरणात शिक्षा सुनावली.

विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. या प्रकरणाचा सविस्तर निकाल अद्याप हाती आलेला नाही. यशोमती ठाकूर यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत घातली. सरकारी कामात अडथळा आणणे, पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण आदी कलमं यशोमती ठाकुरांवर लावण्यात आली होती. ठाकूर यांची जामिनावर सुटकाही झाली आहे.

हेही वाचा...भाजप आमदाराच्या निकटवर्तीय नेत्याकडून पोलिसांसमोरच गोळीबार

गेल्या वर्षी मुंबईतल्या हॉस्पिटलमध्येही यशोमती पाटील यांनी रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याची बातमी समोर आली होती. आमदारांना भेटू का दिलं जात नाही, असं म्हणत त्यांनी रुग्णालयात राडा घातल्याचा VIDEO व्हायरल झाला होता.

First published:
top videos

    Tags: Yashomati thakur