मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजप नेत्या भडकल्या, म्हणाल्या सरकार अजून किती बळी जाण्याची वाट पाहणार

भाजप नेत्या भडकल्या, म्हणाल्या सरकार अजून किती बळी जाण्याची वाट पाहणार

 महिला दिनाच्या दिवशीच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात तरूणीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती.

महिला दिनाच्या दिवशीच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात तरूणीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती.

महिला दिनाच्या दिवशीच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात तरूणीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती.

शिर्डी,10 मार्च: महिला दिनाच्या दिवशीच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात तरूणीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. चार दिवस उलटून गेले तरीही पोलिसांना अजूनही आरोपी सापडत नाही आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी मंगळवारी पीडित तरूणीच्या कुटूंबीयाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. सरकार अजून किती जणींचा बळी जाण्याची वाट पाहणार आहे, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना थांबायचं नाव घेत नाही आहे. अकोले तालुक्यातील खानापूर येथे महिला दिनाच्या दिवशीच एका तरूणीचा मृतदेह सापडला. सात तारखेला शेळ्या चारण्यासाठी गेलेली देऊबाई गिर्हे ही 30 वर्षीय तरुणी संध्याकाळी घरी परतलीच नाही. रात्रभर तिचा शोध सुरू होता तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याचा गुन्हा अकोले पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असला तरी चार दिवस उलटून गेले तरी अजूनही आरोपी मोकाटच आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या चित्रा वाघ यांनी माजी आमदार वैभव पिचड यांच्या समवेत पीडितेच्या घरी जाऊन भेट घेतली. घटनास्थळी व कुटूंबियांशी भेटल्यावर चित्रा वाघ यांनी सरकारवर टीका केली. हेही वाचा..पालघर पुन्हा हादरलं, डहाणू आणि तलासरीला बसले भूकंपाचे 8 धक्के अजून किती दिवस अशा घटना सुरू राहणार अकोलेतील घटना दुर्दैवी असून नराधम अजूनही मोकाटच आहे. मुख्यमंत्री आणी गृहमंत्री कधी पावलं उचलणार आहेत? अजून किती बळी गेल्यानंतर तुम्ही ठोस कारवाई करणार आहात? असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. सरकारच्या महिला पोलिस ठाणे उभारण्याच्या भूमिकेचं स्वागत आहे. मात्र यामुळे महिलांची सुरक्षा होणार आहे का? हे सरकारनं स्पष्ट करावं. जे पोलिस स्टेशन सध्या आहेत ते अद्ययावत का केले जात नाही. अनेक जिल्ह्यात पोलिस संख्याबळ कमी आहे ते का भरले जात नाही, असा सवाल करत सर्वात मोठा अहमदनगर जिल्ह्यात आज पोलीस अधीक्षक नाही. तीन महिन्यांपासून पोलिस अधीक्षकपद रिक्त असून सरकार याकडं लक्ष देणार का? याकडं सुद्धा लक्ष वेधलंय. हेही वाचा.. दहा दिवस होते पोलीस मुक्कामी, डॉक्टरांच्या चिट्ठीवरून हाती लागली टोळी! एकीकडे अकोले तालुक्यातील अनेक घटनांचा तपास लागत नसताना अशा दुर्दैवी घटना घडत असून सरकारने पीडित कुटुंबियाला मदत करण्याची मागणी माजी आमदार वैभव पिचड यांनी केली. सध्या या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू असून आरोपी कधी गजाआड होणार हा प्रश्न आहे. काही संशयितांची चौकशी केली जात असून लवकरच आरोपी अटक होईल हा विश्वास पोलीस उपअधिक्षक रोशन पंडीत यांनी व्यक्त केला आहे.
First published:

Tags: Udhav thackeray

पुढील बातम्या