मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजप नेत्यानं मनापासून केलं राज ठाकरेंचं अभिनंदन; म्हणाले आम्हीही तुमच्यासोबत

भाजप नेत्यानं मनापासून केलं राज ठाकरेंचं अभिनंदन; म्हणाले आम्हीही तुमच्यासोबत

भाजप आणि मनसे मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येणार का?

भाजप आणि मनसे मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येणार का?

भाजप आणि मनसे मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येणार का?

  • Published by:  Sandip Parolekar
नागपूर, 19 नोव्हेंबर: राज्यात वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर मनसे (MNS) आक्रमक झाली आहे. वीजबिल माफीच्या (Electricity Bill)मुद्द्यावरून मनसे आंदोलन छेडणार आहे. एवढंच नाही कर मनसे 'महाराष्ट्र बंद'ची ( Maharashtra Band) हाक देणार असल्याचंही बोलंल जात आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj thackeray)यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मनसे आंदोलनात भाजपही त्यांच्यासोबत राहील, असं वक्तव्य भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (BJP Leader Chandrashekhar Bavankule) यांनी केलं आहे. बावनकुळे यांच्या या वक्तव्यावरून भाजप आणि मनसेत वेगळीच खिचडी शिजत तर नाही ना, या चर्चांना उधाण आलं आहे. हेही वाचा..संजय राऊतांची बॉडी लँग्वेज आत्मविश्वास हरवलेली, प्रवीण दरेकरांनी केला पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे मोठं विधान केलं. ते म्हणाले, राज्यात वीज खात्याचा कारभार भोंगळ झाला आहे. राज ठाकरेंच्या वीजबिल माफीच्या आंदोलनात भाजपही सहभागी होणार आहे. महावितरण वीज कनेक्शन तोडणीसाठी आलं तर भाजप आपला झेंडा घेवून तिथे हजर राहणार आहे. राज ठाकरेसाहेबांचं मी अभिनंदन करतो, असंही बावनकुळे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजप- मनसे एकत्र? मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची काल मुंबईत बैठक पार पडली. भाजपने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर लगेचच बावनकुळे यांनी मनसेच्या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या निमित्ताने भाजप आणि मनसे महापालिका निवडणुकीत एकत्र येणार का? अशी चर्चाही रंगू लागली आहे. मनसेचा राज्य सरकारला इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करुन राज्य सरकारला इशारा दिला आहे. 'वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण"लाथो के भूत बातों से नही मानते" असं संदीप देशपांडे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. हेही वाचा...भाजप सरकारच्या 5 वर्षांच्या काळात तब्बल 36 हजार 992 कोटींची वीज बिल थकबाकी संदीप देशपांडे म्हणाले की, 'मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही ऊर्जा सचिवांची भेट घेतली होती. तेव्हा सरकार वाढीव वीज बिलांसंदर्भात दिलासा देण्यात तयार होतं. आता मात्र हा युटर्न घेतला आहे. केंद्र सरकार असो वा राज्य सरकार असो, त्यांचे वाद चालूच राहतील. यामध्ये लोकांना दिलासा मिळवा हीच आमची मागणी राहील.'
First published:

Tags: BJP, Maharashtra, Raj raj thackeray, Raj thackarey

पुढील बातम्या